WhatsApp वर Blurry Image स्कॅम; सायबर चोरट्यांच्या निशाण्यावर कोण?, कसा कराल बचाव…

WhatsApp Scam : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲपवर फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. हॅकर्स यूजर्सच्या फोनवर अस्पष्ट फोटो (Blurry Image) पाठवून यूजर्सची फसवणूक करत आहे. माहितीनुसार या फसवणुकीत यूजर्सला अडकवण्यासाठी हॅकर्स कॅप्शनसह अस्पष्ट दिसणारा फोटो यूजर्सच्या मोबाईलमध्ये पाठवतात. अनेक यूजर्स फोटो डाउनलोड करत असल्याने त्यांची फसवणूक होते.
माहितीनुसार, हॅकर्स यूजर्सला अस्पष्ट फोटोंसह ‘आम्हाला तुमचा जुना फोटो सापडला आहे’ किंवा ‘बघ, या फोटोतील व्यक्ती तुमचा भाऊ आहे’ अश्या कॅप्शनसह फोटो पाठवतात.
हॅकर्सना फोनवर पूर्ण प्रवेश मिळतो
माहितीनुसार, या फसवणूकीत हॅकर्स स्टेगॅनोग्राफी युक्तीचा वापर करतात. या पद्धतीचा वापर करुन हॅकर्स यूजर्सच्या कोणत्याही फोटोमध्ये मलीशियस कोड एम्बेड करुन त्याचा वापर करु शकतात. मलीशियस कोड असल्याने यूजर्सने फोटोवर क्लिक करताच मालवेअर मोबाईलमध्ये प्रवेश करतो आणि हॅकर्सला मोबाईलमध्ये प्रवेश मिळतो.
मेसेज आणि OTP पाहू शकता
मालवेअर मोबाईलमध्ये प्रवेश केल्याने हॅकर्स यूजर्सच्या फोनवरील बँकिंग आणि UPI अँप्समध्ये प्रवेश करुन तसेच टेक्स्ट मेसेजमध्ये प्रवेश करुन सर्व ओटीपी देखील पाहू शकतात. इतकंच नाही तर मालवेअर मोबाईलमध्ये असल्याने हॅकर त्याच्या इच्छेनुसार यूजर्सच्या डेटाशी छेडछाड करु शकतो आणि यूजर्सची आर्थिक फसवणूक करु शकतो.
स्वतःला असे सुरक्षित ठेवा
अनोळखी नंबरवरून आलेले फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करु नका
जर तुम्हाला तुमच्या फोनवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून कोणताही फोटो किंवा व्हिडिओ आला तर त्याकडे दुर्लक्ष करा. फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करण्यापूर्वी ज्या नंबरवरून तुम्हाला फोटो मिळाला आहे त्या नंबरवर कॉल करून ती व्यक्ती कोण आहे याची पुष्टी करू शकता. पूर्णपणे समाधानी झाल्यानंतरच फोटोवर क्लिक करा.
ऑटो-डाउनलोड बंद करा
स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही व्हॉट्सॲपमधील ऑटो-डाउनलोड फीचर बंद करू शकता. तुम्हाला व्हॉट्सॲप सेटिंग्जमध्ये दिलेल्या स्टोरेज आणि डेटा विभागात मीडिया ऑटो-डाउनलोडचा पर्याय मिळेल.
पीएफ क्लेम अन् व्हेरिफिकेशन…, EPFO चे 2 मोठे नियम बदलले; कोट्यवधी ग्राहकांवर होणार परिणाम
तुमचे डिव्हाइस नियमितपणे अपडेट ठेवा
स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत राहणे महत्त्वाचे आहे युजर्सच्या सुरक्षिततेसाठी कंपन्या नियमित अपडेट्स जारी करतात. यामध्ये ओएस अपडेट्स तसेच सुरक्षा पॅचेस समाविष्ट आहेत, जे फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करतात.