इंडियन आयडॉल च्या मंचावर पुन्हा जाण हे घरी जाण्यासारख वाटतं – अभिजीत सावंत !

सोनी टीव्ही वर प्रसारीत होणाऱ्या यंदाच्या इंडियन आयडॉल सीझन मध्ये अभिजीतची विशेष उपस्तिथी बघायला मिळणार आहे.

Untitled Design (46)

Untitled Design (46)

Abhijeet Sawant will appear on the Indian Idol stage : जगभरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गावजून पहिल्या वहिल्या इंडियन आयडॉल चा विजेता ठरलेला ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंत ! आजवर त्याने अनेक सुपरहीट गाणी केली आणि रसिक प्रेक्षकांना मोहित केलं आहे आता पुन्हा एकदा इंडियन आयडॉलच्या मंचावर दिसणार आहे. सोनी टीव्ही वर प्रसारीत होणाऱ्या यंदाच्या इंडियन आयडॉल सीझन मध्ये अभिजीतची विशेष उपस्तिथी बघायला मिळणार आहे.

सोशल मीडिया वर नुकताच एक प्रोमो आला असून इंडियन आयडॉलच्या वीकेंडस्पेशल भागात अभिजीत दिसणारअसल्याचं कळतंय. हा मंच प्रत्येक गायकांसाठी कायम स्मरणीय राहिला असून अभिजीत ला पुन्हा या मंचावर बघण ही पर्वणी असणार आहे यात शंका नाही !

सुजय विखेंच्या वक्तव्यापासून शेतकरी प्रश्नांपर्यंत; विवेक कोल्हेंनी मांडली आपली सविस्तर भूमिका

या मंचावर पुन्हा एकदा जाण्याबद्दल अभिजीत सांगतो “ इंडियन आयडॉल सारखा मंच जो आज अनेक संगीतकार गायक लोकांना प्रोत्साहित करतो अश्या मंचावर पुन्हा जाण ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे पहिला वहिला विजेता ते आज एक स्पेशल गेस्ट म्हणून इथे जाऊन परफॉम करण ही भावना खूप सुखद आहे. इंडियन आयडॉल च्या मंचावर पुन्हा एकदा जाऊन येणं हे अगदीच घरी आल्यासारखं वाटणार आहे. जिथून माझ्या सांगतिक प्रवासाची सुरुवात झाली आज तिथे जाऊन अनेक गायकांची गाणी अनुभवण हा अनुभव शब्दात न मांडता येणारा आहे”

तरुणाई च्या सोबतीने हल्लीच्या जेनझीच मन जिंकून घेणारा ट्रेंड सेटर गायक म्हणून अभिजीत ओळखला जातोय. आगामी काळात अभिजीत वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट मध्ये काम करताना दिसणार असल्याचं देखील कळतंय.

Exit mobile version