Download App

अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत! सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित

Ankit Mohan In Pailwan New Marathi Song : अभिनेता अंकित मोहन (Actor Ankit Mohan) बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्यात दिसणार आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झालाय. गाण्यामधील अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत आहे. मराठमोळ्या लोकसंगीताची जादू जगभर पसरवण्यासाठी ‘बिग हिट मीडिया’ (Pailwan Song) रेकॉर्ड लेबल पुन्हा सज्ज झालंय. पैलवान गाणं लवकरच आपल्या भेटीला येतंय. आला बैलगाडा, शिवबाचं नाव, लैला मजनू, दोस्ती यारी, अप्सरा या गाण्यांच्या घवघवीत यशानंतर बिग हिट मीडिया आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नातं जोडणारं एक मराठमोळ ‘पैलवान’ गाणं घेवून येत आहे.

या गाण्यामध्ये अंकित मोहनसोबत भूषण शिवतारे, दीनानाथ सिंग, शंभू आणि आयुष काळे हे देखील झळकणार आहेत. नुकतंच सोशल मीडियावर या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित ( Marathi Song) झालाय. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलंय. तर गाण्याला ब्रम्हा यांनी संगीतबद्ध केलं आहे. ब्रम्हा आणि भूषण विश्वनाथ यांनी गाण्याची गीतरचना केलीय. मनीष महाजन यांनी या गण्याचं दिग्दर्शन केलं आहे. या गाण्याची निर्मिती हृतिक अनिल मनी अन् अनुष्का अविनाश सोलवट यांनी केलीय. या गाण्याच्या प्रोमोची सर्वत्र चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतेय.

Marathi Movie : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळयात ‘बापल्योक’ चा डंका, ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव

निर्माता हृतिक अनिल मनी यांनी पैलवान गाण्याविषयी सांगितलं की, “महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या मातीतलं मराठमोळं लोकसंगीत जगभर पसरवण्यासाठी आम्ही विविध गाणी या रेकॉर्ड लेबलमार्फत प्रदर्शित करत आहोत. या गाण्यासाठी अभिनेता अंकित मोहन याने आपल्या फिटनेसवर संपूर्ण महिनाभर मेहनत केलेली आहे. तसंच पैलवान दिसण्यापेक्षाही पैलवान कश्या पद्धतीने विचार करत असतील? सोबतच त्यांचं वागणं आणि बोलणं या सर्वच गोष्टींचा अभ्यास अंकितने केलाय.

Marathi Movie: लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट, आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘पाणीपुरी’

गाण्याच्या प्रोमोला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय. असंच प्रेम गाण्यावरही करा हिचं सदिच्छा, असं निर्माता हृतिक अनिल मनी यांनी आवाहन केलंय. तर निर्माती अनुष्का अविनाश सोलवट ‘बिग हिट मीडिया’च्या नव्या गाण्याविषयी सांगितलं की, “मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी फारच उत्सुक असते. आम्ही गाण्यांच्या माध्यमातून मराठी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. ‘बिग हिट मीडिया’ रेकॉर्ड लेबल वरील ‘पैलवान’ हे गाणं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तुमचं असंच प्रेम आमच्यासोबत कायम राहू देत, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

 

follow us