Kuljit Pal : रेखाला मोठ्या पडद्यावर लाँच करणारे निर्माते काळाच्या पडद्याआड; बॉलिवूडवर शोककळा

Kuljit Pal : रेखाला मोठ्या पडद्यावर लाँच करणारे निर्माते काळाच्या पडद्याआड; बॉलिवूडवर शोककळा

Kuljit Pal : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल (Kuljit Pal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. या बातमीमुळे अनेक चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

कुलजीत पाल हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने-निर्माते होते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना कुलजीत पाल यांनी सिनेमात पहिला ब्रेक दिला होता. परंतु काही कारणाने हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. कुलजीत पाल यांनी ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘दो शिकारी’ आणि ‘आशियाना’ सारख्या हिंदी सिनेमांची निर्मिती केली आहे.

कुलजीत पाल यांच्या लेकीचे नाव अनु पाल (Anu Pal) आहे. ‘आज’ या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमामध्ये राजीव बाटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमामध्ये त्यांनी मार्शल आर्ट ट्रेनरची भूमिका साकारली होती. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जादू दाखवण्यात थोडासा कमी पडला होता.

Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन

कुलजीत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खूपच खालावली होती. कुलजीत यांचा मॅनेजर संजय बाजपेयीने दिलेल्या माहितीनुसार, कुलजीत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने खूपच त्रस्त होते. अखेर २४ जून २०२३ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ निर्माते कुलजीत पाल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीने एक चांगला निर्माता गमावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २५ जून २०२३ रोजी कुलजीत पाल यांच्या पार्थिवावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित मंडळी अंत्यसंस्काराच्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. तर २९ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube