Download App

अभिनेते दलील ताहिल यांना 2 महिन्यांचा तुरंगवास, पाच वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ प्रकरणात सुनावली शिक्षा

  • Written By: Last Updated:

Dalip Tahil : अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलीप ताहिल (Dalip Tahil) यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल (drunk driving) दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; सुर्या-शमीला संधी 

2018 मध्ये, दलीप यांनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या खार भागात एका ऑटोला धडक दिली होती, त्यात एक महिला जखमी झाली होती. अपघातात जखमी झालेल्या महिला जेनिता गांधी यांनी फिर्याद दिली होती. रिक्षाने जात असतांना दाहिल यांच्या कारने आमच्या रिक्षाला धडक दिली. अपघातानंतर दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जन मिरवणुकीत अडकल्याने ते पळून जाऊ शकले नाही. ताहिल गाडी चालवत होते, हे आमच्या लक्षात आलं. त्यांनी आमच्यासोबत वाद घातला. आम्ही त्यांच्या गाडीचा नंबर लिहू घेतला, असं जेनिता यांनी आपल्या जबानीत म्हटलं होतं. याप्रकणी ताहिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात दलील हे दारूच्या नशेत गाडी चालवत होते आणि अपघात होताच घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं. घटनास्थळावरून त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या पुराव्याच्या आधारे 5 वर्षांनंतर त्याला दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवून 2 महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

मुंबईच्या खार पोलिस स्टेशनच्या निरीक्षकाने सांगितले की, दलीप ताहिल यांनी रक्त तपासणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता. पोलिसांनी अपघातात बळी पडलेल्या तिघांची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर अभिनेता ताहिलला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

ताहिल यांनी बाजीगर, राजा, इश्क, रावन, कहो ना प्यार है आणि सोल्जर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज