Actor Dino Morea arrested by Mumbai Police in connection Mithi River irregularities : राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणाची चर्चा असताना आता ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळीत झालेल्या मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डिनो मोरियाचं नाव दिशा सालियान प्रकरणामध्ये देखील चर्चेला आलं आहे. मात्र ही कारवाई मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी करण्यात आलेली आहे.
‘आज माझं खुश आहे मन, कारण ठाकरे बंधू करताहेत आंदोलन’; रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंना टोला
मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटकेची कारवाई केली आहे. आज सकाळपासून त्याची चौकशी सुरू होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. अटक केल्यानंतर दिनो मोरिया याला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे. मिठी नदीतील कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात दिनो मोरिया याची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. मिठी नदीच्या कामातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. या तपासादरम्यान एकूण 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये दिनो मोरिया याचंही नाव समोर आलं होतं.
शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
यानंतर दिनो मोरिया याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली. आता या प्रकरणात दिनो मोरियाची पुढील चौकशी केली जाणार असून, कथित गैरव्यवहारातील त्याची भूमिका आणि संबंधित व्यवहारांबाबत तपास यंत्रणेकडून अधिक माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.
