अभिनेता करण कुंद्राची माणुसकी कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Actor Karan Kundra : निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरच्या ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या माणुसकीचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल आहे. त्यानंतर सोशल मीडिया युजर्संकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतोय. करण कुंद्राची हृदयस्पर्शी वागणूक अनेकांना माणुसकी शिकवून जाते. एका गरजू चाहत्याला त्याने आपसूक मदत केली […]

Karan Kundra

Karan Kundra

Actor Karan Kundra : निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूरच्या ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता करण कुंद्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या अनोख्या माणुसकीचं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल आहे. त्यानंतर सोशल मीडिया युजर्संकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होतोय.

करण कुंद्राची हृदयस्पर्शी वागणूक अनेकांना माणुसकी शिकवून जाते. एका गरजू चाहत्याला त्याने आपसूक मदत केली आणि तो चर्चेत आला. त्याचा मदत करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि एका अभिनेत्यापलिकडचा करण बघायला मिळाला.

‘थँक यू फॉर कमिंग’मध्ये करण कुंद्रा सहा वर्षांनंतर अभिनेता अनिल कपूरसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘थँक फॉर कमिंग’ नावाचा कॉमेडी चित्रपट येत आहे. शोभा कपूर, एकता कपूर, अनिल कपूर आणि त्यांची मुलगी रिया कपूर मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तसेच या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वीच एक पोस्टर समोर आले होते. या पोस्टरमध्ये भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी यात दिसत आहेत.

“घुमर”ची चर्चा सातासमुद्रापार; मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवलं स्टँडिंग ओव्हेशन

15 सप्टेंबर 2023 रोजी रॉय थॉमसन हॉल येथे टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 च्या वर्ल्ड प्रीमियरसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. रिया कपूरचा पती करण बुलानी ‘थँक यू फॉर कमिंग’मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Exit mobile version