“घुमर”ची चर्चा सातासमुद्रापार; मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवलं स्टँडिंग ओव्हेशन

“घुमर”ची चर्चा सातासमुद्रापार; मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळवलं स्टँडिंग ओव्हेशन

Ghoomer movie : ‘घुमर’ चित्रपट येत्या 18 ऑगस्टला रिलीज होतोय. त्यामुळे ‘घुमर’ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये संपन्न झाला. यावेळी चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवलं. दिग्दर्शक आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा 18 ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सयामी खेर, अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार आहेत.

क्रिकेटवर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे. घुमरच्या टीमने नुकतीच मेलबर्न मधील MCG स्टेडियमला देखील भेट दिली. त्यामुळे “घुमर”ची चर्चा आता सातासमुद्रापार पोहचली आहे.

दमदार ट्रेलरने मन जिंकले
ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे तर सयामी खेर एका अपंग क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसत आहे. नैराश्याने एका वेळी ती आत्महत्येचा प्रयत्न करते आणि नंतर देशाची महान खेळाडू बनते.

धमाकेदार ओपनिंगनंतर ‘गदर 2’ YouTube वर लीक; दोन दिवसांत दमदार कलेक्शन

मुरली कार्तिककडून सयामीने घेतलं प्रशिक्षण
या चित्रपटात सयामी एका डावखुऱ्या गोलंदाजाची भूमिका साकारत आहे. सयामी नॉर्मल आयुष्यात तिची कामे उजव्या हाताने करते. त्यामुळे तिला ट्रेनिंग नितांत गरज होती. या चित्रपटासाठी सायमीने भारताचा माजी फिरकीपटटू मुरली कार्तिककडून खास प्रशिक्षण घेतले आहे.

NAAC मूल्यांकनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, राज्यातील 1 हजार 957 उच्च शिक्षण संस्थाचे पूर्ण

सोशल मीडियावर ‘घूमर’ ट्रेडिंगमध्ये
‘घूमर’चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ट्रेलरला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘घूमर’मध्ये अभिषेक बच्चन आणि सयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटात शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube