Download App

Kiran Mane Post: किरण माने यांची गौतमी पाटीलसाठी ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले, ‘तू पाटलीण…’

Kiran Mane Post: आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami patil ) आपल्या नृत्यांगना धुमाकूळ घालत आहे. अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ अशा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटना आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाईन- ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या खोचक टीकांमुळे गौतमी पाटील ही खूपच चर्चेत आहे.


आता तिच्या आडनावावरुन मोठा गोंधळ सुरू आहे. गौतमीचे आडनाव पाटील नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतमीला पाटील आडनाव लावण्याविषयी थेट इशारा दिला आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करत असल्याचे म्हटले जात आहे.

गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावरून सध्या चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे. गौतमी पाटीलने यावर चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असं बेधडक वक्तव्य गौतमीने केलं आहे. एकीकडे गौतमीला असा विरोध होत असताना अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली आहे.


यामध्ये त्यांनी गौतमीच्या बेधडक स्वभावाचे खूपच कौतुक केले आहे, तिच्या आडनावावरुन मोठा वाद उकरून काढणाऱ्या लोकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी या पोस्टमधून समाजाच्या संकुचित विचारांवर जोरदार ताशेरे ओढले आहे.

किरण माने यांच्या या पोस्टची मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे गौतमीच्या चाहत्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खाजगी आयुष्यावर काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीने तिचे जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून वय २५ असल्याचे सांगितले एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

Tags

follow us