प्रेरणा जंगम
Natya Parishad Awards : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अखेर सुरु झाले आहे. (Marathi Theater Council) यावेळी झालेल्या कार्यक्रमात दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी यांनी तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह सुरु झाल्याची नांदी दिली. (Akhil Bharatiya Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या गो. ब. देवल स्मृतीदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा याच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आजोयित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या गोविंद देवल बल्लाळ पुरस्कारांचे वितरण तसेच नूतनीकरण झालेल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन… pic.twitter.com/r8juYrOeHO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 14, 2023
या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना परिषदेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर पद्मश्री परशुराम खुणे यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासाठी 1 कोटींची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात आयोजिच करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अभिनेते मोहन जोशी, खासदार राहुल शेवाळे, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त गिरीश गांधी, शशी प्रभू, भाऊसाहेब भोईर, नरेश गडेकर, सतीश लोटके, अशोक हांडे, कार्यवाह अजित भुरे, सहकार्यवाह सुनील ढगे, विजय चौगुले मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोहन जोशी यांनी आपले मनोगत व्यक केले. ते म्हणाले की, “ मी सगल्या कलावंतांचा ऋणी आहे. तुमच्याकडून मला शिकायला मिळाले. बॅकस्टेज कलाकार यांचीही मला मदत मिळाली. रसिक प्रेक्षक, माझे कुटुंबियांच्या मदतीमुले मला कार्य करता आले. तर वंदना गुप्ते यांनीही त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, “ही रंगभूमी अशीच चालू राहू दे. मला अजून खूप नाटके करायची आहेत.
Marathi Theater Council: नाट्यगृहांना येणार अच्छे दिन; CM शिंदेंनी जाहीर केली एक खिडकी योजना
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही यावेळी त्यांचं मनोगत व्यक्त केलय. ते म्हणतात की, “यशवंतराव चव्हाण नाट्य गृह हे 3 वर्षे बंद होते. आमच्या टीमने ते सुरु करण्यासाठी काम पूर्ण केले. 30 मे रोजी नाट्यगृहाचे काम सुरु करण्यात आले. युद्धपातळीवर काम पूर्ण करुन 14 जूनची तारीख गाठली. आज आनंदाने आणि अभिमानाने आम्ही इथे उभे आहोत. येत्या काळात उत्तम कलावंत आणि तंत्रज्ञ तयार करण्यासाठी नाट्य परिषद काम करेल. पाच वर्षांचा अजेंडा तयार असून आमची टीम त्यासाठी एकत्रितपणे काम करेल.” तेव्हा आगामी काळात यशवंतराव चव्हाण नाट्य गृहात विविध कलाकृती पाहण्यासाठी नाट्यरसिकांची पुन्हा गर्दी जमेल एवढं नक्की.