ब्रेकिंग : बॉलिवूडचा ‘सन ऑफ सरदार’ काळाच्या पडद्याआड; प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन

Actor Mukul Dev has passed away : बॉलिवूड क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘सन ऑफ सरदार’ सारख्या बॉलिवूड चित्रपटासह अनेक चित्रपट गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू […]

Letsupp Image   2025 05 24T112152.034

Letsupp Image 2025 05 24T112152.034

Actor Mukul Dev has passed away : बॉलिवूड क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘सन ऑफ सरदार’ सारख्या बॉलिवूड चित्रपटासह अनेक चित्रपट गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काल (दि.23) रात्री उपचारादरम्यान मुकुल यांची प्राणज्योत मालवली. ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत काम केलेले अभिनेते विंदू दारा सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरचित्रवाणी मालिकेने मुकुल देव यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती.

मुकुल यांच्या अचानक एक्झिटने अनेकांना धक्का 

चित्रपट जगतातील एवढ्या प्रसिद्ध चेहऱ्याने अचानक जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडसह अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देव यांच्या निधनाच्या बातमीनंतर इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री दीपशिखा नागपालने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर मुकुल देव यांच्यासोबतची एक स्टोरी शेअर करताना लिहिले आहे की, मुकुल देव आता या जगात नाही यावर माझा विश्वासच बसत नसल्याचे अभिनेत्री नागपालने म्हटले आहे.

‘दस्तक’ मधून मोठ्या पडद्यावर झाली एन्ट्री 

१९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरचित्रवाणी मालिकेने मुकुल देव यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच वर्षी त्याने ‘दस्तक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. मुकुल यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘वजूद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९), ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘सन ऑफ सरदार’ (२०१२), ‘आर… राजकुमार’ (२०१३) आणि ‘जय हो’ (२०१४) यांचा समावेश आहे.  याशिवाय मुकुल देव यांनी पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Bharati Gosavi : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे निधन

अभिनयासह मुकल होते प्रशिक्षित पायलट

मुकुल देवचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील हरि देव हे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त होते. २०१९ मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मुकुल यांचा भाऊ राहुल देव हा देखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. मुकुल यांनी दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. याशिवाय मुकुल यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून वैमानिक प्रशिक्षण घेतले होते ही बाब अनेकांना माहिती नव्हती.

Exit mobile version