Download App

Naseeruddin Shah: वडील मुलांच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाहचे भाष्य; म्हणाले, ‘आयुष्यातील खलनायक…”

Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब (Social media) अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच सिनेमा, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमात नसीरुद्दिन यांनी मोठी कामगिरी केली आहे. तसेच ते मध्यंतरी त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे (Web series) जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळाले आहे. ते यामध्ये मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारले होते.


आता नसीरुद्दीन पुन्हा दिग्दर्शनामध्ये हटके एन्ट्री केल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल असलेल्या नात्याबद्दल भाष्य केल्याचे बघायला मिळाले आहे. आपलं आपल्या वडिलांशी कधीच सख्य नव्हतं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठे खलनायक होते, असं नसीरुद्दीन यांनी भाष्य केल्याचे बघायला मिळत आहे. एवढंच नाही तर आपण आपल्या वडिलांसारखं वागणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नसीरुद्दीनने यावर भाष्य केले आहे. म्हणाले आहे की, ‘मी माझ्या मुलांशी माझ्या वडिलांसारखा कधी वागणार नाही. माझ्या मुलांनी मला मिठी मारावी आणि मन मोकळेपणाने  गप्पा मारता यावे, अशा मताचा मी माणूस आहे. मी माझ्या मुलांना एकदाही ओरडलो किंवा फटकारलं नाही. जे माझ्या वडिलांनी केलं. ते मी माझ्या मुलांन वरती कधी लादणार नाही, कारण त्यांना माझी कढीही भीती वाटायला नकोय. यामध्ये मला कितपत यश आलं आहे, ते मला ठाऊक माहिती नाही.

Boys 4 Song: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरने गायलं गाण; ‘बॉईज ४’चं पहिले गाणे रिलीज

तसेच पुढे नसीरुद्दीन म्हणाले आहेत की, “मी कायम माझ्या वडिलांना आयुष्यातील सर्वात चांगला खलनायक समजत असायचो, आणि त्यामुळे मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरायचो जसा त्यांचा हळवा स्वभाव होता. नसीरुद्दीन यांच्या वडिलांची आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं अशी खूप इच्छा होती. परंतु एकंदर नसीरुद्दीन यांचा अभ्यासाकडे असणारा कल त्यांच्या लक्षामध्ये आला होता. याविषयी नसीरुद्दीने सांगितले आहे की, मी नववीमध्ये नापास झालो, त्यावेळेस माझे वडील मला म्हणाले की नाटकच केलंस तर पोटाची भूक कशी भागवणार? असा प्रश्न त्यांनी मला त्यावेळेस केला होता.

Tags

follow us