Download App

‘पंचबीट फेम’ अभिनेता निखिल भांबरी सांगतोय त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट बद्दल…

  • Written By: Last Updated:

Nikhil Bhambri : भारतीय मनोरंजन विश्वातील एक उगवता अभिनेता निखिल भांबरी (Nikhil Bhambri) याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पंचबीटमध्ये (Punch beat) खोडकर अधीश आणि ब्लॅक विंडोजमध्ये सूड घेणारी जहॉं सरदेसाई ही भूमिका साकारून निखिलने आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली. दरम्यान, अनेक प्रोजेक्टमध्ये विविधांगी भूमिका साकारल्यानंतर त्यानं त्याच्या स्वप्नातील भूमिकांविषयी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीच्या स्वातंत्र्याची ‘चिरफाड’; अटकेच्या अधिकारांबाबत नवी मार्गदर्शक तत्वे 

निखिल भांबरी आपल्या स्वप्नातील भूमिकेविषयी म्हणाला की, मला अगदी अस्सल पात्रे आणि अस्सल अनुभव असलेलं कथानक हवं आहे. मग ते एखादं कौटुंबिक नाटक असो, वा विचार करायला लावणारा चित्रपट असो किंवा एखादा हलका-फुलका चित्रपट असो… खरंतर प्रत्येक भूमिका ही खास असते. पण, मनासारखी भूमिका साकारायला मिळणं, हे प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं, तसं मीही चांगल्या भूमिकेच्या संधीची वाट पाहत आहे.

निखिल त्याच्या कलाकृतीविषयी प्रामाणिकपणा आहे. कुठलीही भूमिका साकारतांना तो जीव ओतून काम करतो, भूमिकेविषयीचे बारकावे समजून घेतो. त्याच्या याच सवयीमुळं त्याला आजवर वेगवेगळ्या भूमिका मिळत आल्यात. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या लक्षात राहत आहे.

निखिलचं कलेबद्दलचं अतूट समर्पण, कथानकाची जाण, भूमिकेचा अभ्यास ह्या बाबी त्याला नक्कीच यशांच्या मोठ्या शिखरावर घेऊन जातील. निखिलने आजवर पंचबीट, व्हूज युवर डॅडी, ब्लॅक विडो, पंचबीट 2 आदी वेबसिरीज आणि काही अॅड फिल्ममध्ये काम केलं आहे. त्याने ‘ब्लॅक विडोज’मध्ये शमिता शेट्टी, मोना सिंग, शरद केळकर या बड्या कलाकारांसोबत काम केलं होतं.

निखील सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपले फोटो आणि व्हिडिओज शेअर करून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो.

Tags

follow us