Download App

हास्याची मेजवानी… ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’चं बीटीएस व्हिडीओ पाहिलंत का?

Hastay na Hasaylach Pahije:  गेल्या अनेक दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूपच जोरदार चर्चेत आला.

Hastay na Hasaylach Pahije BTS Video Release:  गेल्या अनेक दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable ) हा खूपच जोरदार चर्चेत आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ (Hastay na Hasaylach Pahije ) लवकरच कलर्स मराठीवर (Colors Marathi) घेऊन येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=I3VaJwgTNb8

कार्यक्रमाचा नवा धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने अनेकांची उत्सुकता आणखीच टांगणीला पडली होती. शोचे प्रोमो, टिझर आणि शीर्षक गीत रिलिज झाल्यापासून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच जोरदार चर्चा रंगली होती.

नुकतच या शोच्या प्रोमोचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. रसिकांनी या व्हिडीओला खूप मोठा प्रतिसाद दिला असून कंमेंट्स आणि लाईक्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव केला आहे. हा प्रोमो शूट करतानाची मज्जा, मस्ती आणि धमाल तुम्ही यामध्ये तुम्ही बघू शकणार आहात. हा व्हिडीओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडणार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने आणि सुपर्णा श्याम यांना पाहू शकणार आहे. त्याचसोबत कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे देखील या प्रोमो शूटच्या वेळी हजेरी लावले होते.

‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची संपूर्ण टीम पोट धरून हसत होती. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल या देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर जोरदार हसताना पाहायला मिळाले होते.

Ayushmann Khurrana : युथ आयकॉनने न्यूयॉर्कमधील युनिसेफच्या मुख्यालयाला दिली भेट, म्हणाला…

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. या शोच्या प्रोमोचा बीटीएस व्हिडीओ तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत अकाउंटवर पाहू शकणार आहे. हा शो शनिवार-रविवार रात्री 9 वाजता आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकणार आहात.

follow us