Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’चा नवा खेळ रंगणार; कोण सांगकाम्य ठरणार अन् कोण मालक?

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’चा नवा खेळ रंगणार; कोण सांगकाम्य ठरणार अन् कोण मालक?

Bigg Boss Marathi Season 5 Day 59 : ‘बिग बॉस मराठी’ हा (Bigg Boss Marathi Season 5) छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. (Bigg Boss Marathi ) दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार (Bigg Boss Marathi New Task) पडत असतो. घरातील हा नवा खेळ पाहण्यासाठी ‘बिग बॉस’प्रेमी खूप उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरीत सदस्य ठरतील त्यांचे मालक. मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेसुद्धा त्यांना करावी लागतील”. त्यामुळे आज घरात रंगत येणार आहे. कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की, अभिजीत, डीपी दादा आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. निक्की म्हणतेय,”तिकीट टू फिनाले म्हणजे काय टॉप 5.”. त्यावर डीपी दादा म्हणतात,”मी तुला टॉप 5 मध्ये पाहतोय”. निक्की म्हणते,”माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे”. डीपी दादा पुढे निक्कीला म्हणतात,”जसं तुला वाटतंय ना हा व्यक्ती घरात करतोय काय? कशासाठी आलाय”. त्यावर निक्की म्हणते,”मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्ही काल माझं तिकीट टू फिनाले काढलं…पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे”.

Bigg Boss Marathi: ‘तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय’, अभिजीतने निक्कीला सुनावलं

अभिजीतने निक्कीला सुनावलं

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की आरडाओरडा करत म्हणतेय,”अभिजीतचे चाहत्यांची इच्छा होती की तो कॅप्टन बनेल. पण याने अंकिताला बनवलं”. त्यावर निक्कीला उत्तर देत अभिजीत म्हणतोय,”आमच्यात लोकशाही आहे. तुमच्यात हुकुमशाही होती. तुम्ही खेळातही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय”.

निक्की पुढे म्हणतेय,”हे सगळं करुन तुला मला वाईट ठरवायचं असेल… तर आजपासून माझ्यासोबत बोलू नको”. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन आजपासून आणखी रंगतदार होणार आहे. काही दिवसांतच हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व सदस्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube