Actor Prasad Oak And Swapnil Joshi In Jilabi Movie : नुकताच जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रसाद ओकने स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक तर केलं, पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील (Swapnil Joshi) आणि प्रसाद (Prasad Oak) पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
मोठी घडामोड! ब्रिक्समध्ये इंडोनेशियाची एन्ट्री, पाकिस्तान अस्वस्थ; चीनचाही प्लॅन फेल
दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओक स्वप्नीलबद्दल बोलताना म्हणाला की, आम्हाला जिलबीच्या निमित्ताने दोघांना स्क्रीन स्पेस शेयर करता आली. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करतोय. जिलबीच्या सोबतीने आमच्या अनेक कामाची एकत्र सुरुवात झाली. जिलबी होत असताना आमचं ठरलं की, आपण सुशीला सुजीत करतोय. त्यामुळं आमच्यासाठी जिलबी अगदीच खास (Jilabi Movie) आहे. स्वप्नील कमालीचा अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करताना देखील तितकीच मज्जा आली. मी सेटवर स्वप्नीलला कायम निरखून बघायचो. त्याची काम करण्याची पद्धत काम करण्याचा उत्साह हे सेटवर एक खेळीमेळीच वातावरण निर्माण करणार असायचं. स्वप्नील एक अभिनेता म्हणून उत्तम आहे, पण निर्मिती विश्वात तो काहीतरी वेगळं करू पाहतोय. येणाऱ्या काळात देखील स्वप्नील उत्तम प्रोजेक्ट्स करेन, अशी मला खात्री आहे.
सहकलाकाराकडून मिळणारं कौतुक हे प्रत्येक अभिनेत्यासाठी खास असतं, यात शंका नाही. जिलबीमध्ये स्वप्नील एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय. पण, आता ही जिलबी नक्की गोड की गूढ? हे चित्रपट गृहात जाऊन बघावं लागणार (Marathi Movie) आहे.
“मनसेने मतं खाल्ल्याने आमचे १० उमेदवार पडले”; शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा दावा
जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट 17 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.