“मनसेने मतं खाल्ल्याने आमचे १० उमेदवार पडले”; शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा दावा

“मनसेने मतं खाल्ल्याने आमचे १० उमेदवार पडले”; शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा दावा

Yogesh Kadam on Raj Thackeray MNS : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व राखलं. आता राज्य सरकारचं कामकाज सुरू झालेलं असताना मनसे आणि शिंदे गटात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महायुतीत मनसेला एन्ट्री घेता आली नाही असा दावा काल मनसेने केला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री योगेश कदम यांनी मनसेवर (Yogesh Kadam) जोरदार प्रहार केला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे दहा उमेदवार पराभूत झाले असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री कदम पुढे म्हणाले, धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले 57 आणि आम्हाला पाठिंबा दिलेले 3 अपक्ष असे शिवसेनेचे 60 आमदार आहेत. पण, याच विधानसभा निवडणुकीत आमचे दहा उमेदवार मनसेमुळे पडले. जर गणित पाहिलं. मतांची आकडेवारी पाहिले तर आमचे जे दहा उमेदवार पराभूत झाले आहेत ते मनसेने जितकी मते खाल्ली त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहेत. म्हणून आता मला असे वाटते की याची पुनरावृत्ती होऊ नये. आता महायुती आणखी मजबूत करायची असेल. हिंदुत्व भक्कम करायचे असेल आणि मुंबईत पुन्हा महायुती निवडून आणायची असेल तर राज ठाकरे यांनी सोबत येण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन मंत्री योगेश कदम यांनी केले आहे.

राज ठाकरेंचे इंजिन यार्डातच रुतले, वंचितलाही धक्का; दोघांच्या 96 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

मनसेच्या 119 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याच्या बाबतीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यापैकी 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने 200 मतदारसंघांत उमेदवार दिले होते. त्यापैकी 194 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.

शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या सर्व पक्षांच्या साधारण 1 ते 10 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसे, रासप आणि वंचितच्या 95 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने या पक्षांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण

follow us
  • fb
  • instagram
  • youtube