Prashant Damle: अभिनेता प्रशांत दामले यांना मातृशोक; आई विजया दामले यांचे निधन

Prashant Damle: मराठी अभिनेता प्रशांत दामलेंनी (Prashant Damle) नाटक, सिरीयल आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमामध्ये आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटविला आहे. दरम्यान प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई सौ विजया दामले यांची आज सकाळी 10 वाजता प्राणज्योत मालवली आहे. प्रशांत दामले यांची आई विजया दामले यांची आज सकाळी १० वाजता प्राणज्योत मालवली […]

Prashant Damle

Prashant Damle

Prashant Damle: मराठी अभिनेता प्रशांत दामलेंनी (Prashant Damle) नाटक, सिरीयल आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमामध्ये आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटविला आहे. दरम्यान प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई सौ विजया दामले यांची आज सकाळी 10 वाजता प्राणज्योत मालवली आहे.

प्रशांत दामले यांची आई विजया दामले यांची आज सकाळी १० वाजता प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील आंबोली स्मशानभूमीमध्ये दुपारी ४ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


राजश्री मराठी चॅनेलने याबद्दल अधिकृत इंस्टावरुन पेज वरून माहिती दिली आहे . विजया दामले असे त्यांचे नाव असून त्या 93 वर्षांच्या होते. त्यांच्या जाण्यानं दामले परिवारावर मोठी शोककळा पसरली आहे.

प्रशांत दामले हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून परिचित आहे. मराठी रंगभुमीवरचे लोकप्रिय कलावंत म्हणून ते चांगलच परिचित आहेत. दामले यांनी आजवर अनेक वेगवेगळे प्रयोग करुन मराठी रंगभुमीवर नाटकांचे रेकॉर्डब्रेक प्रयोग केल्याचे बघायला मिळते. नाटकांचे प्रयोग करण्यासाठी प्रशांत आता सध्या अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. यावेळी कारण सुद्धा तसंच काही अनोखं होत. शैक्षणिक निधी उभारण्यासाठी प्रशांत दामले अमेरिकेमध्ये नाटकांचे प्रयोग करणार आहेत.

Exit mobile version