Download App

कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही, ही आहे…; प्रशांत दामलेंची खास पोस्ट चर्चेत

Prashant Damale :  अभिनेते प्रशांत दामले यांची आजवर अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर येऊन गेली आहेत. त्यांच्या नाटकांना रसिक प्रेक्षकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला आहे. आजही त्यांच्या नाटकांना प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात. प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वी साडे बारा हजार नाटक प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबलेला नाही. त्यांनी आपले नाटकाचे प्रयोग सुरुच ठेवले आहेत.

प्रशांत दामले हे फक्त अभिनेतेच नसून गेल्या काही वर्षांपासून ते नाटकांची निर्मिती देखील करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘नियम व अटी लागू’ या नाटकाची निर्मिती केली आहे. यावरुन त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग – महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


‘नियम व अटी लागू’ या नाटकाचा पहिला प्रयोग 18 मार्च रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला आहे. यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमूख व अभिनेता प्रसाद बर्वे हे कलाकार आहेत. या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनीच केलेली आहे.

Virat Kohli Anushka Sharma Dance Video : विराट-अनुष्काने जिममध्ये केला डान्स, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वीच आखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी आपले पॅनेल उभे केले होते. त्यांनी या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांच्या पॅनेलचा पराभव केला आहे.

Tags

follow us