दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण…, दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट, कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

साउथ इंडस्ट्रीत तयार झाल्यानंतर त्याचा हिंदी रिमेकदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 22T153827.663

अजय देवगणने चित्रपटात जबरदस्त अभिनय (Film) असलेल्या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाने लोकांची मने जिंकली.  हा चित्रपट इतका हिट झाला की चित्रपट निर्मात्यांनी सात वर्षांनी ‘दृश्यम २’ हा चित्रपट लगेच प्रेक्षकांच्या भेटीस आणला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. ‘दृश्यम’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

साउथ इंडस्ट्रीत तयार झाल्यानंतर त्याचा हिंदी रिमेकदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागातील थरारक सस्पेन्स आणि दुसऱ्या भागातील बुद्धीचा खेळ प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेला. हा चित्रपट केवळ मोहनलालच्या कारकिर्दीतीलच नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

श्रेयस तळपदेची भव्य निर्मिती आणि स्त्री सामर्थ्याची गाथा सांगणाऱ्या “मर्दिनी” चित्रपटाचा मुहूर्त शॉट संपन्न !

अजय देवगणचा दृश्यम हा मोहनलाल अभिनीत मल्याळम चित्रपट दृश्यमचा रिमेक आहे. मोहनलालचा दृश्यम हा चित्रपट आधीच दोन भागात प्रदर्शित झाला आहे आणि अजय देवगणचा चित्रपट देखील दोन भागात प्रदर्शित झाला आहे. मोहनलाल आणि अजय यांनी पाच महिन्यांपूर्वी दृश्यम ३ चे शूटिंग स्वतंत्रपणे सुरू केले होते.

आता, लवकरच एक चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे. दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि दिग्दर्शकाने एक मोठी अपडेट दिली आहे. ‘दृश्यम ३’ हा चित्रपट ‘दृश्यम दिनी’ प्रदर्शित होणार असून २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये सर्वांसमोर येणार आहे. अजय देवगण अभिनीत हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नसले तरी, अभिनेता मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चे मल्याळम आवृत्ती निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे.

follow us