Download App

Mahajani Death: तीन दिवस दार बंद अन् घरातून दुर्गंधी…शेजाऱ्यांनी सांगितला महाजनींच्या मृत्यूची आपबिती

Ravindra Mahajani Death Story: जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani ) यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. आणि ते सर्वात आधी कळालं. (Ravindra Mahajani Passed Away) त्यामुळे शेजाऱ्यांनी सांगितली मृत्यूची आपबिती सांगितली आहे…

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

नेमकं काय घडलं?
पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील भाड्याच्या घरामध्ये महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील एका बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे. ते गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. काल सकाळी थोड्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. आणि परत दुपारनंतर ती आणखी जास्त प्रमाणात येऊ लागली होती. त्यानंतर नेमकं वास कुठून येत होता हे शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु नेमका वास कुठून येत होता, हेच कोणाच्या लक्षात येत नव्हतं.

‘देखणा नट अन् माझा चांगला मित्र…; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक मामा झाले भावुक

त्यावेळेस शेजाऱ्यांच्यानी याची माहिती सिक्योरिटीला दिली. यानंतर सिक्योरिटीने देखील या घटनेविषयी पोलिसांना माहिती दिली. पुढे नंतर मग पोलिसांना दरवाजा तोडला, आणि रविंद्र महाजनी यांचं मृतदेह दिसून आले असल्याचे शेजाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. रविंद्र महाजनी यांचं वावर देखील चांगला होता, ते नेहमी कोणाशी बोलायचे वगरे नसायचे. परंतु आपल्या कॉलनीमध्ये नेमका कोणता अभिनेता राहत होता याची कल्पना शेजारच्यांना आजिबात नव्हती. या घटनेची माहिती समोर आल्यांनतर शेजारच्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त लावला जात आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला आहे. यानंतर त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले होते. यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित ‘झुंज’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेमाक्षेत्रात एन्ट्री केली होती. तसेच त्यांचे लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Tags

follow us