Sajid Khan passes away : मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ मध्ये भूमिका साकारणारे आणि नंतर माया आणि द सिंगिंग फिलिपिना सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमुळे प्रसिद्धीस आलेले अभिनेते साजिद खान (Sajid Khan) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज वयाच्या ७० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा समीर यांनी दुजोरा दिला.
IND vs SA Test : डीन एल्गरचे दमदार शतक, यजमान संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
साजिद खान यांचा एकुलता एक मुलगा समीर यांनी पीटीआयला सांगितले की, साजिद खान गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होता. ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत केरळमध्ये राहत होते. त्यांनी सांगितले, माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर यांनी दत्तक घेतले होते आणि त्यांचे पालनपोषण चित्रपट निर्माता मेहबूब खान यांनी केले होते. दरम्यान, माझे वडील साजिद खान हे गेल्या काही काळापासून चित्रपट जगतापासून दूर झाले आणि ते लोकांच्या कल्याणासाठी काम करत होते. ते अनेकदा केरळला जायचे आणि तिथेच त्यांनी दुसरं लग्न केलं आणि स्थाईक झाले.
केरळमध्ये अंत्यसंस्कार झाले
त्यांच्या मुलाने पुढे माहिती दिली की साजिद खान यांच्यावर केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘मदर इंडिया’नंतर खानने मेहबूब खानच्या ‘सन ऑफ इंडिया’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. खान यांनी मायामधील त्यांच्या भूमिकेने किशोरवयीन आयडॉल म्हणून जागतिक स्टारडम मिळाले होते. याशिवाय, अमेरिकन टीव्ही शो ‘द बिग व्हॅली’च्या एका एपिसोडमध्येही ते दिसले होते. याशिवाय ‘इट्स हॅपनिंग’ या म्युझिक शोमध्येही ते गेस्ट जज म्हणून दिसले होते.
साजिद खान यांनी हीट एंड डस्ट (1983), डकैत मुखिया, दहशत (1981), जिंदगी और तुफान (1975) महात्मा एंड द मॅड बॉय (1974) सवेरा (1972), द सिंगिंग फिलिपिना (1971) माया (1966), राजी सन ऑफ इंडिया (1971), मदर इंडिया (1957) यासारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या.