Download App

नार्वेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये ! ‘या’ चित्रपटात दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

Sanjay Narvekar in Ranti movie : अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) ‘बॅक इन अ‍ॅक्शन’मध्ये आल्याचं दिसत आहे. नार्वेकरांनी मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूड देखील गाजवलं आहे. ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आता नार्वेकर ‘रानटी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ (Ranti) चित्रपटातून ‘सदा राणे’ नावाच्या खलनायकाची भूमिका साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलीय. ही चित्ररेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे. २२ नोव्हेंबर रोजी पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीमधील अ‍ॅक्शनपट (Marathi Movie) आपल्या भेटीला येणार आहे. हा सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट ठरण्याची शक्यता आहे.

‘उडूदे भडका’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोगच्या जोशपूर्ण अंदाजाने वेधलं लक्ष

संजय नार्वेकर यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत दिसणारा परंतु आतून अतिशय कपटी असा खलनायक साकारणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. संजय नार्वेकर यांची ही भूमिका चित्रपटाच्या कथानकाला वळण देत असून प्रेक्षकांना धडकी भरवणारी असल्याचं सांगितलं जातंय.

संजय नार्वेकर म्हणतात की, कथेच्या गरजेनुसार भूमिकेमध्ये शिरणं माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक आहे. अशा भूमिका खूप कमी लिहिल्या जातात. दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची संधी मिळाली. मी माझ्या पद्धतीने ही भूमिका पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटामध्ये काम करणं , हा नेहमीच भन्नाट अनुभव असतो.

प्रसाद ओक यांच्या प्रयत्नांना अखेर यश! मराठी चित्रपटांना मिळणार हक्काचं अनुदान; किती आहे रक्कम?

समित कक्कडच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जबरदस्त असते. त्यामुळे त्यात भूमिका साकारणं प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. प्रेक्षकांना सुद्धा हा ‘सदा राणे’ दीर्घकाळ लक्षात राहील याची खात्री संजय नार्वेकर यांनी दिलीय.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांनी लिखाण, अजित परब यांनी संगीत, अमर मोहिले यांनी पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांनी साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांनी छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांनी संकलन केलंय. एक भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम रानटी चित्रपटाला लाभलेली आहे.

 

follow us