‘उडूदे भडका’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोगच्या जोशपूर्ण अंदाजाने वेधलं लक्ष

‘उडूदे भडका’  गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पुष्कर जोगच्या जोशपूर्ण अंदाजाने वेधलं लक्ष

The A.I. Dharma Story Movie : ‘दि एआय धर्मा स्टोरी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला (Marathi Movie) आलंय. या गाण्याचं नाव ‘उडूदे भडका’ आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा चित्रपट आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. येत्या २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) देखील या गाण्यात दिसत आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या रंजक ट्रेलरने चाहत्यांच्या मनात एक विशेष गूढ निर्माण केलंय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात (Udu De Bhadka Song) आहेत. दरम्यान आता या चित्रपटातील ‘उडूदे भडका’ हे पहिलंच गाणं सोशल मीडियावर झळकलं आहे. या गाण्यात पुष्कर जोग एका अनोख्या आणि जोशपूर्ण रूपात दिसतोय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

New Movie Update: पुष्कर जोग घेऊन येतोय नवाकोरा सिनेमा, इन्स्टाग्रामवरून केली घोषणा

मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला हितेश मोडक यांचं संगीत लाभलंय. तर हे गाणे बॉलिवूडला सुपरहिट गाणे देणारे प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग आणि हितेश मोडक यांनी गायलंय. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल शेट्ये यांनी केलंय. ‘उडूदे भडका’ या गाण्यामधून नायकाच्या मनातील राग, बदल्याची आग, आक्रमकता व्यक्त होताना दिसतेय.

लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळातील बापाची थरारक गोष्ट! ‘द AI धर्मा स्टोरी’चा रंजक ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर जोग या गाण्याबद्दल सांगतात की, ” बदला घेण्यासाठी पेटून उठणाऱ्या नायकाच्या मनातील राग या गाण्यातून व्यक्त होतोय. गाण्याचे बोल खूप अर्थपूर्ण आहेत. त्याला हितेश मोडक यांचे सर्वोत्कृष्ट संगीत लाभलंय. त्यामुळे हे गाणं अधिकच रंजक बनलंय. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग आणि हितेश मोडक यांच्या भारदस्त आवाजाने या गाण्याला एका विशेष उंचीवर नेलंय.

हे गाणं अतिशय भव्य झालंय. प्रेक्षकांनी या गाण्याच्या माध्यमातून चित्रपटातील संघर्ष आणि तीव्र भावना यांचा अनुभव करावा, अशी आमची अपेक्षा आहे. पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले हे प्रमुख भूमिकेत आहेत. बियु प्रॅाडक्शन निर्मित असलेल्या या चित्रपटाच्या तेजल पिंपळे या निर्मात्या आहेत.

हे गाणं रिलीज झाल्यामुळे आता चित्रपटात नेमकं काय दडलंय, कोणती कहाणी आहे? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘उडूदे भडका’ या गाण्यामध्ये पुष्कर जोगचा जोशपूर्ण अंदाज पाहायला मिळतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube