Pushkar Jog च्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ रिलीज डेट समोर; प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Pushkar Jog च्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ रिलीज डेट समोर; प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Pushkar Jog Film Dharma the AI story release date out : पुष्कर सुरेखा जोग ( Pushkar Jog ) दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ ( Dharma the AI story ) या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे.

Rohit Saraf: रोहितच्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ गाण्यावर चाहत्यांनी खास प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बॉलिवूडचा सुपरस्टार…’

प्रोमोमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येतात. एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील.

Nigeria Attack : धक्कादायक! बंदूकधारी गावात घुसले; अंदाधुंद गोळीबारात ४० लोक ठार

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतो, ” काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच ‘धर्मा- दि एआय स्टोरी’च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल. परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज