Pushkar Jog : अपघातानंतर अभिनेता मायदेशी परतला, एअरपोर्टवर अशा अवस्थेत…

Pushkar Jog : अपघातानंतर अभिनेता मायदेशी परतला, एअरपोर्टवर अशा अवस्थेत…

Pushkar Jog Health Update: मराठी क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog). पुष्करला आपण विविध सिनेमांंमध्ये अभिनय करताना दिसत असतो. पुष्कर जोग सोशल मीडियावरही (social media) कायम सक्रीय असतो. पुष्कर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होता. (Pushkar Jog Health) पण पुष्करच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली. ती म्हणजे आगामी सिनेमाच्या शुटींगदरम्यान पुष्करला गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे.

याबद्दल अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. दरम्यान त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली माहिती समोर आली आहे. दुखापतीनंतर पुष्कर भारतात परतला असून त्याला मुंबईतील रुग्णालयात आणण्यात आलं आहे. पुष्करच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुष्कर सध्या दुखापतीवर उपचार घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


अभिनेत्याची पोस्ट

“काल एका एक्शन सीक्वेन्सचं शुटींग करताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झालं आहे. मला खुप वेदना होत होत्या. यातून लवकर बाहेर पडणे खूप कठीण दिसत आहे. मला आईची आठवण येत आहे, असं म्हणत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे त्याच्या अपघाताची माहिती सर्वांना मिळाली.

दिव्यांग चाहत्याने Sonu Sood चं मन जिंकलं; मसीहा म्हणत बाईकवर लिहिला खास संदेश

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या सिनेमाचं शुटींगमध्ये व्यस्त होता. आणि या सिनेमाच्या शुटींगच्या दरम्यानचं पुष्करचा अपघात झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी सिनेमा राहणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube