Nigeria Attack : धक्कादायक! बंदूकधारी गावात घुसले; अंदाधुंद गोळीबारात ४० लोक ठार

Nigeria Attack : धक्कादायक! बंदूकधारी गावात घुसले; अंदाधुंद गोळीबारात ४० लोक ठार

Nigeria Attack : आफ्रिकेतील देश नायजेरियातून धक्कादायक बातमी समोर आली (Nigeria Attack) आहे. देशातील उत्तर मध्य पठारी राज्यात बंदूकधाऱ्यांना केलेल्या अंदाधुंद गोळीबारात कमीत कमी चाळीस लोकांचा मृत्यू झाला आहे. हे हल्लेखोर गोळीबार करूनच थांबले नाहीत तर त्यांनी येथील काही घरांना आग लावली. या घटनेमुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधाऱ्यांनी जुराक आणि डाकाई या गावांमध्ये गोळीबार केला आणि घरांना आग लावली. या गोळीबारात जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात काही जण जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारी कंपन्यांची विक्री, खासगीकरणातून दूर करणार कंगाली; पाकिस्तानचा अजब निर्णय

या घटनेची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अल्फ्रेड अलाबो म्हणाले, की सुरक्षा दलांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी बंदूकधाऱ्यांची टोळी सोमवारी रात्री गावात घुसली. या बंदूकधाऱ्यांनी काहीही विचार न करता गोळीबारास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने लोक भयभीत झाले. सैरावैरा पळत सुटले. या गोळीबारात ४० लोकांना जीव गमवावा लागला.

गावात गोळीबार करणाऱ्या या हल्लेखोरांना स्थानिक भाषेत डाकू म्हणतात. नंतर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सात हल्लेखोर मारले गेले. येथून पळून जाताना हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नऊ लोकांचा मृत्यू झाला आणि या हल्लेखोरांनी सहा घरांना आग लावली. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. गावातील एका रहिवाशाने सांगितले की गावात घुसलेल्या या हल्लेखोरांनी काहीच विचार न करता गोळीबार केला. यात ४० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. मी जीव वाचवून कसा तरी शेजारच्या गावात पोहोचलो. त्यानंतर अजून मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना पाहिलेलं नाही.

लग्नावरून घरी जात होते पण, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; 100 लोकांचा मृत्यू

दुचाकीवरून आलेल्या बंदूकधाऱ्यांनी गावावर हल्ला केला. अंदाधुंद गोळीबार केला. काही घरांना आगी लावल्या. गावातील काही लोकांचे अपहरण केले अशी माहिती स्थानिकांनी एका वृत्तसंस्थेला दिली. नायजेरियात मागील काही दिवसांत ग्रामीण भागात हल्ले आणि अपहरणाच्या घटना समोर आल्या आहेत. हल्लेखोर शक्यतो उत्तर नायजेरियातील ग्रामीण भागात वसुलीसाठी लोकांचे अपहरण करतात. येथील गावे, शाळांवर नेहमीच हल्ले होतात. काही वेळेस प्रवाशांवरही हल्ले होतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज