लग्नावरून घरी जात होते पण, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; 100 लोकांचा मृत्यू

लग्नावरून घरी जात होते पण, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; 100 लोकांचा मृत्यू

Boat Accident in Nigeria : नायजेरियात मोठी दुर्घटना (Boat Accident in Nigeria) घडली आहे. पोलीस आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न समारंभावरून परतणाऱ्या तीनशे लोकांना घेऊन निघालेली एक बोट नदीत उलटली. या घटनेत शंभरपेक्षा जास्त लोक बुडाले तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. उत्तर मध्य नायजेरियात ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

समाचार एजन्सी एएफपीनुसार, नायजर प्रांतात लग्न समारंभ होता. प्रवाशांनी भरलेली बोट क्वारा राज्यात निघाली होती. पाऊसही सुरू होता. त्यात क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत होते. क्वारा राज्याच्या पोलीस सूत्रांनी सांगितले की आतापर्यंत या दुर्घटनेत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 100 पेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात यश मिळाले आहे.

Demonetization : ये पब्लिक है! आप शेर तो हम सव्वाशेर, दोन हजारांच्या नोटा कुठे खपवल्या जातायेत?; सर्व्हेतून आलं समोर

नाइजर नदीत बोट बुडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मागील महिन्यातही अशीच दुर्घटना घडली होती. या घटनेत 15 मुले बुडाली होती तर 25 बेपत्ता झाली होती. मागील वर्षात एका गावातील 29 मुले याच नदीत बुडाली होती. मागील वर्षात डिसेंबर महिन्यात आलेल्या पुरात कमीत कमी 76 लोक बुडाले होते.

नायजर नदी पश्चिम आफ्रिकेतील मुख्य जलमार्ग आहे. हा प्रमुख व्यापारी मार्ग देखील आहे. नायजेरियाच्या राष्ट्रीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने दुर्घटना रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी बोटी नदीत घेऊन जाण्यावर बंदी घालण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच जहाजे ओव्हरलोड करणे देखील अपराध असल्याचे म्हटले होते. मात्र, असे असतानाही नियमांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या भागात असे अपघात वारंवार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube