Demonetization : ये पब्लिक है! आप शेर तो हम सव्वाशेर, दोन हजारांच्या नोटा कुठे खपवल्या जातायेत?; सर्व्हेतून आलं समोर

Demonetization : ये पब्लिक है! आप शेर तो हम सव्वाशेर, दोन हजारांच्या नोटा कुठे खपवल्या जातायेत?; सर्व्हेतून आलं समोर

Demonetization : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे ला एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला. आरबीआयने 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा, असा सल्लाही दिला आहे. तर नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या या नोटा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना या नोटा बँकेतून बदलून घेता येतील. मात्र आरबीआयने असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अनेक ठिकाणी लोक बॅंकांमध्ये ही नोट बदलण्याऐवजी बाजार पेठेत खरेदीच्यामध्यमातून या नोटा जमा करत आहे. मात्र लोक असं का करत आहेत? याबद्दल एका सर्व्हेक्षणातून माहिती समोर आली आहे. ( A Survey Expose to ho peoples Spent Two Thousand Rupees Note )

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

एका अॅपने हे सर्व्हेक्षण केले आहे. संपूर्ण देशभरातील 22 राज्यांतील तब्बल एक लाख लोकांचं हे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे. त्यामध्ये अशी समोर आली की, लोक 2 हजार रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये जाऊन बदल्याऐवजी त्या पेट्रोल पंप, सोने-चांदी खरेदी, किराणा माल खरेदी करून या नोटा आपल्या खिशातून देऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होताच तामिळनाडूचे मंत्री ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

त्यामुळे लोकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये जाऊन बदल्याऐवजी या नोटा खपवण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. मात्र त्यामध्ये देखील काही समस्या येत असून यामुळे लोकांची फसवणूक देखील होत आहे. मात्र शासनाने कीतीही नियम काढले तरी लोक त्याला पळवाटा शोधतातच हे ही तितकचं खरं.

केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडूसह 22 राज्यांतील लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात 61 टक्के लोक म्हटले आहेत की, आम्हाला 2 हजार रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये जाऊन बदलण्यात काहीच समस्या नाही आल्या तर 42 टक्के लोकांना असं सांगितलं की, त्यांच्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा व्यापाऱ्यांनी कारण देत घेण्यास नकार दिला. तर 51 टक्के लोकांचं म्हणणं आहे. त्यांना नोट बदलण्यास देण्यात आलेला 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचा कालावधी कमी आहे. तो वाढवून देणे गरजेचे आहे. तर त्यांनी नोटा बदल्याण्यास आरबीआयने दिलेली नोटांच्या संख्येची मर्यादा देखील वाढवून द्यायला हवी अशी मतं नोंदवली आहेंत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube