मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होताच तामिळनाडूचे मंत्री ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ
Tamil Nadu Electricity Minister Arrested : मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत त्यांना ओमंडुरार येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे तामिळनाडूसह देशभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
ईडीने काल मंत्री बालाजी आणि अन्य काही लोकांच्या घरी छापे टाकले होते. इरोड जिल्ह्यातील कार्यालयाव्यतिरिक्त त्यांचा गृहजिल्हा करूर येथेही छापेमारी केली. मागील पाच वर्षात दुसऱ्यांदा केंद्रीय तपास यंत्रणांनी सचिवालयात जाऊन तपास केला. या कारवाईचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1668737885242286080?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1668737885242286080%7Ctwgr%5E9cce697d2ac28b5fb54bfea9e3ebfa042933b2f7%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Ftamil-nadu-electricity-minister-balaji-senthil-arrested-after-raid-sudden-chest-pains-admitted-to-hospital-a-a720%2F
विरोधकांना घाबरविण्यासाठी भाजपकडून अशा कारवाया केल्या जात आहेत. भाजप राजनितीक स्वरुपात ज्यांचा सामना करू शकत नाही त्यांना अशा पद्धतीने घाबरविण्याचे राजकारण यशस्वी होणार नाही. बालाजी यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीसुद्धा सचिवालयातील मंत्र्याच्या खोलीची तपासणी करण्याची काय गरज होती हे समजले नाही असे स्टालिन म्हणाले.
डीएकेने भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. द्रमुकचे वरिष्ठ नेते संघटन सचिव आर. एस. भारती यांनी सांगितले की पार्टीने याआधीही अशा कारवाया अनुभवल्या आहेत. मात्र, नेत्यांविरोधात कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशानेच हे प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने बालाजी यांच्याविरुद्ध कथित कॅश फॉर जॉब घोटाळ्यात पोलीस आणि ईडी चौकशीसाठी परवानगी दिली होती. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यातील तरतुदींनुसार छापेमारी केली आहे. बालाजी राज्याचा अबकारी विभाग देखील सांभाळत आहेत. मागील महिन्यात आयकर विभागाने बालाजी यांच्या निकटवर्तियांच्या ठिकाणी छापे टाकले होते.
एमके स्टॅलिन यांच्यासाठी शरद पवार मैदानात, भाजपच्या ‘त्या’ कृतीचा केला निषेध