एमके स्टॅलिन यांच्यासाठी शरद पवार मैदानात, भाजपच्या ‘त्या’ कृतीचा केला निषेध
Sharad Pawar on ED Raids: तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी (V Senthil Balaji) यांच्या घरावर आज (13 जून) ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या छाप्यांचा निषेध करत हे विरोधकांविरुद्ध सूडाचे कृत्य असल्याचे म्हटले आहे.
“विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात ईडीकडून सुरू असलेल्या सततच्या कारवाईचा मी तीव्र निषेध करतो. सेंथिल बालाजी यांच्या कार्यालयावर छापा टाकून अलोकतांत्रिक केंद्र सरकारने विरोधातील आवाज दाबण्याच्या उद्देशाने ईडीला आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावठवले आहे.
तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या निवासस्थानावर आज सकाळी ईडीने छापा टाकला होता. यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या सचिवालयातील कार्यालयात पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यावेळी सेंथिल बालाजीच्या कार्यालयात फक्त तीन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ईडीची टीमकडून त्यांच्या कार्यालयातील काही कागदपत्रांची तपासणी केली.
मोदींकडून बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक, राज्य मुल्य आयोगाने शिफारस केलेल्या हमीभावाला केराची टोपली
मे महिन्यात आयकर विभागाने (आयटी) काही कंत्राटदारांसह सेंथिल बालाजी आणि त्याच्या साथीदारांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यावेळी आयटी अधिकार्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली होती. त्यामुळे त्यांचा भाऊ अशोक यांच्याशी संबंधित अनेक लोकांना अटक करण्यात आली होती.
भारतातील ट्रक ड्रायव्हर्सना येणार सोन्याचे दिवस? राहुल गांधींनी केला अमेरिकेत अभ्यास
विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सूड उगवण्यासाठी केंद्र सरकार आयकर विभागासारख्या एजन्सीचा वापर करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. सेंथिल बालाजी हे द्रमुकचे शक्तिशाली नेते आहेत. स्टॅलिन मंत्रिमंडळात ऊर्जा, प्रतिबंध आणि उत्पादन शुल्क ही मंत्रीपदे आहेत.