Actor Swapnil Joshi Buy New Range Rover Defender : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याच्यासाठी 2024 वर्ष अनेक गोष्टी साठी खास ठरलं. मग ते स्वप्नीलची निर्मिती विश्वात पदार्पण असो किंवा सुपरहिट चित्रपट! अभिनेता आणि निर्माता (Marathi Actor) अशी दुहेरी भूमिका चोखपणे साकारून स्वप्नील अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसतोय.
वर्ष संपताना स्वप्नीलची अजून एक स्वप्नपूर्ती झाली आहे. त्याने त्याच्या नवीन गाडीच स्वागत केलं आहे ! स्वप्नीलने नवी कोरी रेंज रोव्हर डिफेंडर घेतली (Range Rover Defender) असून पुन्हा हे वर्ष खास केलं आहे. त्याने सोशल मीडिया वर खास पोस्ट करून नव्या गाडीबद्दल खास गोष्ट लिहिली आहे. डिअर जिंदगी असं म्हणत आयुष्याला समर्पित एक छान पत्र लिहून त्याने त्याचा भावना व्यक्त केल्या आहेत.
VIDEO : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील धक्कादायक घटना
स्वप्नील म्हणतो की, डिअर जिंदगी- आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं. ही फक्त सुरुवात आहे माहित आहे की, या प्रवासात उतार-चढाव आले आहेत पण जिद्दीने पार करून अजून गोष्टी करण्याची ऊर्मी यातून मिळतेय.
भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र
ब्लॉकबस्टर चित्रपट, सातत्यपूर्ण काम आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार निर्माता – अभिनेता स्वप्नील येणाऱ्या वर्षात देखील खूप चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. जिलबी, सुशीला- सुजीत सोबत अनेक चित्रपटात स्वप्नील दिसणार असून प्रेक्षक त्यांच्या प्रोजेक्ट्ससाठी उत्सुक आहेत. लवकरच जिलबी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशीचा हटके लूक समोर आलाय. तो अगदी हटक्या अंदाजात दिसत आहे.