8 don 75 Movie: एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित ‘8 दोन 75’ (8 Don 75 ) हा सिनेमा अनेक पुरस्कारप्राप्त सिनेमा 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Marathi Movie) सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची (Social media) चांगलीच जोरदार चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याविषयी जागृती करणारा हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे.
‘उदाहरणार्थ निर्मित’ या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ‘8 दोन 75’ फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमाचे निर्मात्याची धुरा सांभाळली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. सिनेमाची पटकथा शर्वाणी- सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी सिनेमाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या सिनेमाची मुख्य वैशिष्ट्यं असणार आहे.
Kalam 376 Announced: महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या ‘कलम 376’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज
सिनेमाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता लागली आहे. शिवाय आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील सिनेमा महोत्सवांमध्ये 90 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या सिनेमाने केली आहे. एका आगळ्यावेगळ्या व संवेदनशील विषयावर आधारित आहे. मात्र सिनेमासारख्या माध्यमातून या विषयाची हाताळणी कशी केली आहे, याबाबत कुतूहल आहे. यामुळे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.