Download App

‘Baipan Bhari Deva’ फेम अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “लोक इतकी नजर लावतात…”,

Aditi Dravid: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा रंगत आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ३० जून रोजी हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला चाहत्यांच्या खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचे सगळे शो सध्या हाउसफुल (Housefull) होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Aditii

या सिनेमाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय यासोबतच या सिनेमातील गाणे देखील चाहत्यांच्या चांगलंच पसंतीत उतरले आहेत. (Super hit song) या सिनेमातील ‘मंगळागौर’ हे गाणं अभिनेत्री अदिती द्रविड (Actress Aditi Dravid) हिने लिहिले आहे. त्याबद्दल तिचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे दिसत आहे. आता तिचीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.


या सिनेमातील ‘मंगळागौर’ या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या गाण्याने यूट्यूबवर २० लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळत असल्याचे दिसत आहे. हे सुपरहिट गाणं अदितीने लिहिले आहे. हे गाणं सिनेमाच्या अगदी शेवटी असल्याने सर्व अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचे दिसून आले आहेत. हे गाणं गेल्या काही दिवस खूप गाजत असल्याचे दिसून येत आहे. तर या गाण्याविषयी अदितीचं खूपच नाव चर्चेत आले आहे.

परंतु आता अशातच आपलं काही चांगलं होत असताना दिसलं की लोक नजर लावत असतात, असं ती यावेळी म्हणाली आहे. अदितीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत सांगितले आहे की, नजर लागणं हे खरं असतं. इतकी नजर लावतात की लोक, दुसरे आयुष्यामध्ये प्रगती करत असतात. कारण ते त्यांना जे काही करून मिळवायचे असते,  त्यासाठी ते खूप मेहनत घेत असतात. परंतु तुम्हालाही काहीतरी मिळवायचं असेल तर नजर लावत बसण्या ऐवजी स्वतःचं कर्तुत्व वाढवावं, प्लीज. याबरोबरच मला जे करायचं आहे, ते मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

परंतु कधी थांबवणार नाही. तुम्हाला जितका प्रयत्न करायचा तितका करा. अदितीने शेअर केलेली ही स्टोरी नक्की कोणाविषयी टाकली होती हे तिने स्पष्ट केलं नाही, परंतु आता या स्टोरीने चाहत्यांचे चांगलंच लक्ष वेधलं आहे.

Tags

follow us