चुकीचा स्पर्श.., अनेकदा प्रेग्नंसी टेस्ट, अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव

मी खूप काही सहन केलंय आणि मला वाटत नाही की आयुष्यात माझ्यासोबत यापेक्षा आणखी काही वाईट घडेल

News Photo   2026 04 24T163158.678

चुकीचा स्पर्श.., अनेकदा प्रेग्नंसी टेस्ट, अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव

अभिनेत्री आणि सोशल मीडिया (Actress) इन्फ्लुएन्सर संदिपा वर्क गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. जवळपास सहा कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी संदिपाला तुरुंगवास भोगावा लागला होता. चार महिने ती तिहार तुरुंगात कैद होती. आता जामिनावर सुटल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत संदिपाने तिचा तुरुंगातील धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

तुरुंगात जाण्यापूर्वीच समाज आणि व्यवस्था तुम्हाला गुन्हेगार मानतात आणि तिथे तपासणीच्या नावाखाली जे काही घडतं, ते कोणत्याही व्यक्तीचा स्वाभिमान धुळीस मिळवण्यासाठी पुरेसं आहे, असं ती म्हणाली. ज्योत्स्ना बेदीच्या पॉडकास्टमध्ये संदिपाने तिहार तुरुंगातील सत्य उघड केलं.

संदिपाने सांगितलं की, तुरुंगात जाण्यासाठी होणारी तपासणी आणि प्रक्रिया इतकी अपमानजनक असते की व्यक्तीला आपला आत्मसन्मान गमावल्यासारखं वाटतं. “ज्यांचे ब्रेस्ट मोठे असतात, अशा महिलांना आणखी अपमानास्पद वागणूक दिली जाते. खाली काही लपवलं आहे का, हे तपासण्यासाठी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जातो.

अनेकांनी मला विचारलं की तुरुंगात माझ्यासोबत जे काही घडलं, त्याचा खुलासा मी का करतेय? मी कोणालाही घाबरत नाही. मी का घाबरावं? तिथे ड्युटीवर असलेल्या मॅडमसुद्धा खूप उद्धटपणे वागतात. काही चांगल्या आहेत, पण बहुतेक जणी उद्धटच आहेत. मी खूप काही सहन केलंय आणि मला वाटत नाही की आयुष्यात माझ्यासोबत यापेक्षा आणखी काही वाईट घडेल”, असं संदिपा म्हणाली.

अपमानजनक वैद्यकीय चाचण्यांना सामोरं जाण्याविषयी आणि अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या असंवेदनशील वागणुकीबद्दल तिने पुढे सांगितलं, “ते मला माझ्या घरातून घेऊन गेले आणि सर्वांत आधी दीन दयाल रुग्णालयात नेलं. तिथे माझी प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली.

Tighi Movie : ‘तिघी’चे अर्धशतक ! वेगळी ओळख टिकवून जिंकला प्रेक्षकांचा विश्वास

ते मला रात्रीच्या वेळी तिथे घेऊन गेले होते आणि तिथल्या नुकत्याच डॉक्टर बनलेल्या तरुणांनी सांगितलं की, हिची प्रेग्नंसी टेस्ट करा. हे खूपच लज्जास्पद होतं. तुमच्याकडे ते अत्यंत घाणेरड्या नजरेनं पाहतात. न्याय मिळण्यापूर्वीच एखाद्याला गुन्हेगार का ठरवलं जातं?”

संदिपाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिला ईडीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. त्यापूर्वी चार महिन्यांहून अधिक काळ तिने तिहार तुरुंगात घालवला होता.

या मुलाखतीत तुरुंगातील काळाबद्दल बोलताना संदिपा ढसाढसा रडली. “तिहार हे एक असं ठिकाण आहे, जिथे मी माझ्या शत्रूंनाही पाठवण्याची इच्छा बाळगणार नाही. मी अक्षरश: तिथे प्रार्थना करायची की माझा मृत्यू व्हावा. त्यातही सर्वांत वाईट भावना तेव्हा येते, जेव्हा तुमच्या आईवडिलांना तुम्हाला भेटण्यासाठी तुरुंगात यावं लागतं. मी त्यांचीसुद्धा माफी मागितली.”

Exit mobile version