तिहार तुरुंगातील अधिकारी निवृत्तीच्या दिवशीच निलंबित! आरोपी सुकेश चंद्रशेखरला घड्याळ घालण्याची परवानगी दिल्याचा आरोप

तिहार तुरुंगातील अधिकारी निवृत्तीच्या दिवशीच निलंबित! आरोपी सुकेश चंद्रशेखरला घड्याळ घालण्याची परवानगी दिल्याचा आरोप

Jail Doctor Suspended On Retirement Day : दिल्लीतील तिहार तुरुंगाची शाखा असलेल्या मंडोली तुरुंगातील अधिकाऱ्यावर त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच कारवाई करण्यात (Jail Doctor Suspended) आलीय. मंडोली येथील मध्यवर्ती कारागृह रुग्णालयाचे आरएमओ डॉ. आर. राठी यांना निलंबित (Retirement Day) करण्यात आलंय. ही कारवाई त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी झाली. राठीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करता कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याला घड्याळ घालण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तातून ही बाब समोर आली.

यानंतर तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आणि अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं की, डॉ. राठी 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार होते. त्याच दिवशी त्याला निलंबित करण्यात आले. त्याच्या निलंबनानंतर, त्याने अशी स्लिप का लिहिली याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तो गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात आरएमओ म्हणून काम करत होता, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

धक्कादायक! भाजप नेत्याने पत्नी आणि 3 मुलांवर गोळ्या झाडल्या; तिघांचाही मृत्यू, पत्नीची प्रकृती गंभीर

सुकेश चंद्रशेखर 2017 पासून अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तुरुंगात आहे. रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती हिच्याकडून 200 कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली तो सध्या तुरुंगात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्रशेखर यांना 4 नोव्हेंबर 2023 रोजी मंडोली तुरुंगात हलवण्यात आले. असा आरोप आहे की, त्याने पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) प्रतिनिधी असल्याचे भासवून अदितीला फोन केला आणि सांगितले की तो तिच्या पतीला तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करत आहे.

तुरुंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखरचे तुरुंगात वर्तन चांगलं नाही. त्याला 11 वेळा शिक्षाही झालीय. दिल्लीतील एका न्यायालयाने आवश्यक सुरक्षा तपासणीनंतर चंद्रशेखर यांना मनगटी घड्याळ देण्याची परवानगी दिली होती. राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या 10 जानेवारीच्या आदेशात म्हटलं होतं की, नियमांनुसार धातू, नाणी, दागिने, दागिने, चष्मा, चलनी नोटा या गोष्टींना परवानगी नाही. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांना मनगटी घड्याळ घालण्याची परवानगी नाही.

नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द

या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करता अशी स्लिप देण्याचा अधिकार आरएमओला होता का? चंद्रशेखर यांना तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात आहेत का? तुरुंग प्रशासनात काही संगनमत आहे का? या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच मिळतील. पण या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाच्या कार्यशैलीवर निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय. या चौकशीतून काय निष्पन्न होते? या प्रकरणात पुढील कारवाई काय होते? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. सध्या डॉ. राठी निलंबित आहेत आणि चंद्रशेखर तुरुंगात आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या