Download App

Bhumika Chawla: सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीने भूमिका झाली भावूक…

Bhumika Chawla: ‘तेरे नाम’ या सिनेमामुळे अभिनेत्री भूमिका चावलाने (Bhumika Chawla) भाईजानबरोबर (Salman Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. नंतर काही काळ अभिनय क्षेत्रापासून लांब राहिलेल्या भूमिकाने आता भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधून (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. भूमिका चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल (Actor Sushant Singh Rajput) भावना व्यक्त केल्या आहेत.


सुशांतच्या मृत्यूने भूमिकाला मोठा धक्का बसला होता. ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात भूमिकाने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच सुशांतसोबत काम करण्याचा तिचा पहिला अनुभव कसा होता याविषयी तिने यावेळी सांगितले आहे. तिने दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान भूमिका चावला म्हणाली की, ‘सुशांत सिंग हा खूप सुंदर व्यक्ती होता. तो जमिनीशी जोडलेला माणूस होता.

‘एम. एस. धोनी…’ या सिनेमासाठी आम्ही रांचीमध्ये शूटिंग करत होतो. तो त्याच्या आयुष्याविषयी आणि इतर अनेक गोष्टींविषयी माझ्याशी बोलत होता. त्यावेळेस माझा मुलगा साधारण एक वर्षाचा होता. मी शूटिंगच्या दरम्यान सुशांतच्या गप्पा ऐकत राहायचे, असा गौप्यस्फोट भूमिकाने यावेळी केला आहे. सुशांतच्या मृत्यूविषयी जेव्हा भूमिकाला कळले तेव्हा तिला सर्वात मोठा धक्का बसला होता. असे भूमिका म्हणाली.


परंतु हे कोविडच्या वेळी घडले. मी त्या वेळी मुंबईमध्ये नव्हते. पहिला मेसेज आला तेव्हा माझा विश्वास बसला नाही. मी जेव्हा व्हॉट्सअॅप उघडले, तेव्हा त्यातील मेसेज बघून मी हरपून गेले असलयाचे तिने यावेळी सांगितले. मी गुगल केले. या घटनेतून मी बराच काळ स्वतःला सावरू शकले नाही. सुशांत खूपच तरुण होता आणि दुर्दैवाने तो बऱ्याच वादात अडकल्याचा दिसून येत होता.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

यामुळे त्याच्या निधनाने माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. कुणी म्हणाले की, तो एकटा होता, कुणी म्हणाले की, तो नैराश्यात होता. मला माहीत नाही की नेमके काय झाले होते,” असे तिने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच भूमिका चावलाने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा २०१६ मध्ये रिलीज झाला होता.

ज्यामध्ये सुशांतने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडला मोठा धक्का बसल्याची माहिती तिने यावेळी दिली आहे.

Tags

follow us