Kangana Ranaut: भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’

Kangana Vs Subramniam Swami : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची सडेतोड मत मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत देखील ती प्रतिक्रियाही देते. अशात आता कंगनाने खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांना चांगलेच फटकारले आहे. With a swimsuit picture and sleazy narrative you are suggesting that I have nothing […]

भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’

भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’

Kangana Vs Subramniam Swami : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची सडेतोड मत मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत देखील ती प्रतिक्रियाही देते. अशात आता कंगनाने खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांना चांगलेच फटकारले आहे.


विजयादशमीच्या दिवशी कंगना रणौतने लाल किल्ल्याजवळच्या मैदानातल्या रामलीला समारंभाला उपस्थिती दर्शवली होती. या ठिकाणी तिने बाण चालवत रावण दहन केलं. तर रावण दहन करण्याचा मान मिळालेली कंगना ही पहिली महिला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलेकडून रावण दहन करणं चुकीचं असल्याचं सांगितले आहे. त्यानंतर कंगना आणि सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

कंगना रणौतचा धनुष्यबाण चालवत असतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट (social media) करण्यात आला आणि तिला काही जणांनी ट्रोल केलं. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोनिका नावाच्या एका युजरने पोस्ट केलेला कंगनाचा व्हिडीओ पोस्ट केला. आणि त्यात कंगनाने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. ही कंगना आहे का? असा सवाल त्या युजरने विचारला. हीच पोस्ट शेअर करत कंगनाला रामलीला महोत्सवात बोलवणं आणि रावण दहन तिच्या हस्ते करणं चुकीचं आहे असं यावेळी सांगण्यात आले. त्यावर कंगनाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.

कंगनाला (Kangana Ranaut) सुब्रमण्यम स्वामींचं म्हणणं आजिबात आवडल नाही. तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, “स्विमसूटमधला एक फोटो आणि घाणेरडी स्टोरी लिहून तुम्ही मला सल्ला देत आहात? राजकारणात तुम्ही हे काय करत आहात? मी हिंदी सिनेमासृष्टीतली महान कलाकार आहे. मी लेखिका, दिग्दर्शक, निर्माती आणि क्रांतीकारी आहे. तुम्ही काय सांगू पाहात आहात माझ्याकडे माझ्या शरीराशिवाय काही नाही हेच ना? लक्षात ठेवा महिला फक्त सेक्स करण्यासाठी नसतात. तर त्यांच्याकडे हात, पाय, मेंदू, हृदय असे सर्वच अवयव आहेत. बाकी सगळं जे पुरुषाकडे असतं किंवा एक महान नेता बनण्यासाठी जरुरी आहे ते आमच्याकडे असतं मग आम्ही ते का बनू नये? सुब्रमण्यमजी उत्तर द्याल? ” असं म्हणत कंगनाने स्वामींना जोरदार हल्लाबोल केला आहे.

Arjun Rampal : आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अर्जुन रामपालची भावूक पोस्ट, म्हणाला…

कंगनाचा तेजस हा सिनेमा आज प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे असंही सोशल मीडियावर कंगनाची जोरदार चर्चा आहे. अशात तिच्या रामलीला मैदानातील रावण दहन कार्यक्रमावरुन तिच्यावर चांगलीच टीकेची झोड होत असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र या टीकेची पर्वा कंगनाने कधी केली नाही. तिने सुब्रमण्यम स्वामींसह सगळ्यांनाच खडे बोल सुनावले आहे.

Exit mobile version