क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम चित्रपटाला प्रेक्षकांची पंसती कायम; 6 व्या दिवशी ओलांडला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा
या चित्रपटाने पहिल्या चार ते पाच दिवसांतच सिनेमानं ५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.पहिल्या दिवशी ₹ ७८ लाखांची ओपनिंग घेतली होती.
मराठी माणसाच्या मनाला थेट भिडणारा आणि मराठी (Marathi) माध्यमात शिकलेल्यांना आपल्या दिवसांची आठवण करून देणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांच्या भेटीला आला आणि हिट जाला झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी पसंती मिळाली आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरही कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाने पहिल्या चार ते पाच दिवसांतच सिनेमानं ५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.पहिल्या दिवशी ₹ ७८ लाखांची ओपनिंग घेतल्यानंतर, शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. पहिल्याच वीकेंडला (शुक्रवार ते रविवार) या चित्रपटानं तब्बल ₹ ३.९१ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सोमवार आणि मंगळवारी म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला देखील सिनेमानं चांगली कमाई केली आहे. सिनेमानं सोमवारी ५२ लाखांचा गल्ला जमवलाय, तर मंगळवारी सिनेमाची कमाई ही ५२.६ लाख इतकी होती.
Lagnacha Shot : अभि क्रितिकाचे केळवण झाले दणक्यात ‘लग्नाचा शॉट’चा टिझर प्रदर्शित
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७८.४३ लाख, दुसऱ्या दिवशी ४७.८९ लाख, तिसऱ्या दिवशी १.१० कोटी आणि चौथ्या दिवशी १.५५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. पाचव्या दिवशी ५२ लाख आणि सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ५२.६ लाख रुपयांचा गल्ला जमवला. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ सिनेमाची सहा दिवसांची एकूण कमाई आता ४ कोटी ९६ लाख रुपये झाली आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाचं संगीत व गाणी उत्तम आहेत. आपण बालपणी ऐकलेली गाणी या चित्रपटात पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या होत आहे. त्याचबरोबर सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे, त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या शाळेची पुन्हा एकदा सफर घडतेय, असं वाटून जातं. हेमंत ढोमेच्या या बहुप्रतिक्षित सिनेमाला समीक्षकांकडूनही दाद मिळत आहे.
