Download App

Chandramukhi 2 Hindi Trailer Out: कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ मधील रौद्रावतार पाहिलात का? 

Kangana Ranaut Movie: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे (Social media) व्यक्त होणं ही कंगनाची खासियत आहे. आताही ती एका आगामी सिनेमा ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) मुळे जोरदार चर्चेत आली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. (Chandramukhi 2 Hindi Trailer) हा व्हिडीओ शेअर करत असताना तिने तिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगितले आहे.

तसेच तिचे चाहते देखील या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमाचा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात कंगनाचा क्वीनचा रौद्रावतार तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. चंद्रमुखी २ हा सिनेमा तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर सध्या हिंदीमध्ये बघायला मिळत आहे. हा ट्रेलर बघून कंगनाचा यामध्ये रौद्रावतार दिसत आहे. यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे.

या सिनेमाचा ट्रेलर बघून प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणार आहे. तब्ब्ल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रमुखी पहिल्या सारखी बघायला मिळणार का? सध्या शी चर्चा जोरदार होत आहे. ‘चंद्रमुखी 2’ च्या हिंदी ट्रेलरमध्ये एक माणूस पहिल्यांदा एका कुटुंबाला तब्ब्ल १७ वर्षांअगोदरची चंद्रमुखीची गोष्ट सांगत असल्याचे बघायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना रनौतची फक्त एकच झलक बघायला मिळाली आहे. तसेच राघव लॉरेन्स अ‍ॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. जो चंद्रमुखीपासून एका कुटुंबाला वाचवणार आहे.

Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैभव तत्ववादीबद्दल काही रंजक गोष्टी…

तसेच या ट्रेलरमध्ये कंगना राजा वेट्टयानच्या दरबारामध्ये पुन्हा एकदा एकदा अप्सरेच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. ट्रेलरमधील कंगनाच्या त्या रौद्ररुपाने सर्वच चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमामध्ये पडणार आहेत. चंद्रमुखी आणि वेट्टैयन आमने-सामने आल्यावर नेमकं काय नवा ट्विस्ट समोर येणार आहे. याची सर्वांचं उत्सुक्ता लागली आहे. हा सिनेमा एकदम हॉरर आणि कॉमेडी असल्याचे सांगितले जात आहे. कंगनाने ‘चंद्रमुखी 2’ मधील तिच्या हटक्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. यासाठी कंगना भारतीय शास्त्रीय नृत्य देखील शिकली असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाचा दमदार ट्रेलर बघितल्यावर  आता प्रेक्षक देखील या सिनेमाची वाट बघत असल्याचे दिसत आहे.

तसेच  २००५ साली ‘चंद्रमुखी’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. जो चाहत्यांना देखील खूप आवडला होता. त्याचा रिमेक देखील हिंदीमध्ये ‘भूल भुलैया’ नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. जो सर्वांना खूपच आवडला होता. परंतु  आता ‘चंद्रमुखी 2’ या साऊथ सिनेमाचा सिक्वेल तयार झाला आहे. आणि तो लवकरच म्हणजे २८ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us