अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

Madhuri Dixit mother Snehlata Dixit passes away: अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत. आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून घेतला ‘तो’ निर्णय; मंत्री गुलाबराव पाटलांनी […]

Madhuri

Madhuri

Madhuri Dixit mother Snehlata Dixit passes away: अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत.

आम्ही मंत्रिपदाचा सट्टा लावून घेतला ‘तो’ निर्णय; मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले बंडखोरीचे कारण

अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही याबाबतची दु:खद बातमी सकाळी शेअर केलीय. आमच्या प्रिय आई स्नेहलता दीक्षित आज सकाळी आपल्या जवळच्या व्यक्तींना सोडून निघून गेली. तिच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता वरळीतील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

आईचे छत्र हरपल्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित, तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माधुरीने 2022 मध्ये आईच्या वाढदिवसाच्या इन्स्टाग्रामवरून काही आठवणी शेअर केल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ! आई ही मुलीची जवळची मैत्रीण असते. तू माझ्यासाठी खूप काही केले आहे. तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी प्रार्थना करते, अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर माधुरीने केलीय.

माधुरी दीक्षितच्या करिअरच्या सुरुवातीला तिच्या आईने तिला खूप मदत केली आहे. फिल्मच्या शूटिंगपासून ते इतर कार्यक्रमांसाठी माधुरीबरोबर तिची आई दिसत होती. माधुरीच्या जडणघडणीत व चित्रपटसृष्टीतील यशासाठी आईने खूप कष्ट घेतले होते.

दुसरीकडे जावई डॉ. श्रीराम नेने यांनीही सासूसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. डॉ. नेने यांनी दोन चहाच्या कपांचे फोटो शेअर केले असून, त्या कपांवर पेंटिंग दिसत आहेत.

Exit mobile version