मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. एका मॉडेलने राखी सावंत विरोधात गंभीर आरोप करत अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी राखी सावंतला अटक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता राखीला अंधेरी न्यायालायात दाखल करण्यात येणार आहे.
अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती चांगलीच अडचणीत आली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी बुधवारी राखीचा एबीए मुंबई सत्र न्यायालयाने फेटळा. त्यानंतर आज राखीला अटक करण्यात आली.
तर आता राखी सावंतची सुटका कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीसोबत सात महिन्यांपूर्वी राखीने लग्न केले. मुस्लिम बॉयफ्रेंड आदिलसोबत लग्न करण्यासाठी राखीने तिचे नावही बदलले आहे.
आता दोघांच्या नात्याकडे लव्ह जिहादच्या अँगलने पाहिले जात आहे. दरम्यान, राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती लव्ह जिहादबद्दल बोलत आहे. तर नुकतच राखी सावंत मराठी बिग बॉगमध्ये देखील आली होती.