Tunnel Men : तब्बू वाईआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्स सीरिज ‘टनल मेन’मध्ये झळकणार
Tunnel Men : तब्बू वाईआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्सवरील ‘टनल मेन’ या सीरिजमध्ये सहभागी झाल्या आहेत. या निमित्ताने त्या पहिल्यांदाच हिंदी
Tunnel Men : तब्बू वाईआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्सवरील ‘टनल मेन’ या सीरिजमध्ये सहभागी झाल्या आहेत. या निमित्ताने त्या पहिल्यांदाच हिंदी ओरिजिनल स्ट्रीमिंग सीरिजमध्ये दिसणार आहेत. ‘टनल मेन’ ही 2023 मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या टनेल रेस्क्यूच्या भावनेपासून प्रेरित असलेली काल्पनिक ड्रामा सीरिज आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये उत्तराखंडमधील कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ आणि अत्यंत आव्हानात्मक बचावकार्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ‘टनल मेन’ ही त्या घटनेमागील भावना, कठीण परिस्थितीत दाखवलेली जिद्द, सांघिक प्रयत्न आणि त्या संपूर्ण बचावकार्यात आशेचा किरण ठरलेली एकजूट यांपासून प्रेरणा घेते.
तब्बू यांची कारकीर्द तीन दशकांहून अधिक काळाची आहे. या प्रवासात त्यांनी मुख्य प्रवाहातील आणि स्वतंत्र सिनेमांमध्ये, तसेच हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये सहजतेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माचिस’ आणि ‘चांदनी बार’मधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले, तर ‘मकबूल’, ‘हैदर’ आणि ‘अंधाधुन’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या अभिनयाची असामान्य रेंज अधोरेखित केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही तब्बू यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या जागतिक प्रोजेक्ट्समध्ये मीरा नायर दिग्दर्शित ‘द नेमसेक’चा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांनी अशिमा गांगुलीची भूमिका साकारली होती. याशिवाय आंग ली यांच्या ‘लाइफ ऑफ पाय’ आणि ‘ड्यून: प्रोफेसी’ या सीरिजमध्येही त्या झळकल्या होत्या. ‘ड्यून: प्रोफेसी’मध्ये त्यांनी सिस्टर फ्रान्सेस्का ही भूमिका साकारली होती. ‘द रेल्वे मेन’चे दिग्दर्शन केलेले शिव रवैल ‘टनल मेन’च्या शोरनरपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. धैर्याची ही नवी कथा ते पुन्हा एकदा त्याच मानवी संवेदनशीलतेने प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
वाईआरएफ एंटरटेनमेंटमध्ये सीईओ अक्षय विधानी यांच्या नेतृत्वाखाली हेड ऑफ कंटेंट म्हणून रुजू झाल्यानंतर सौगता मुखर्जी यांचा ‘टनल मेन’ हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. कंटेंट क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या मुखर्जी यांनी भारतातील अनेक चर्चित सीरिजची धुरा सांभाळली आहे. यामध्ये ‘स्कॅम 1992’, ‘महारानी’, ‘तब्बर’ आणि ‘रॉकेट बॉईज’ यांचा समावेश आहे. यापैकी ‘आर्या’, ‘रॉकेट बॉईज’ आणि ‘रिअल काश्मीर फुटबॉल क्लब’ या सीरिजना इंटरनॅशनल एमी पुरस्कारांसाठी नामांकनही मिळाले आहे.
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस राजीमाना देणार; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
ही सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. यासह वाईआरएफ एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांच्यातील क्रिएटिव्ह भागीदारी पुढे सुरू राहणार आहे. या भागीदारीची सुरुवात 2023 मध्ये ‘द रोमँटिक्स’ या सीरिजपासून झाली होती.