गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Devarkonda) रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या आहेत, त्यानंतर दोघांनी गुपचूक साखरपुडा उरकल्याचंही बोललं जात होतं. अशातच आता दोघांच्याही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चाहत्यांचं स्टार कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा नव्या वर्षात फेब्रुवारीमध्ये लग्न करतील, अशा चर्चा सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न 26 फेब्रुवारी 2026 मध्ये राजस्थानातील उदयपूर इथल्या एका आलिशान राजवाड्यात होणार आहे. दरम्यान, अद्याप रश्मिका मंदाना किंवा विजय देवरकोंडा यांच्याकडून याबाबक कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, दोघांच्या लग्नाच्या तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘थामा’ सिनेमात आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी, रश्मिका विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी गपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी समोर आली होती. आता, लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी, त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरलाय.
कधी आणि कुठे होणार लग्न?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. रश्मिका आणि विजय राजस्थानमधील उदयपूर इथे लग्न करण्याची योजना आखत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विजयच्या एका जवळच्या मित्रानं त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग सांगितलं आहे. दोघेही साऊथ आणि भारतीय दोन्ही पद्धतीनं लग्न करणार आहेत. या वृत्तानं रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
टायटल रिव्हीलसोबत ;मैसाचं पोस्टर प्रदर्शित! रश्मिकाचा सर्वांत दमदार लूक
गेल्या महिन्यात विजय आणि रश्मिकाचा विवाह साखरपुडा विजयच्या हैदराबादच्या घरी झाला होता, अशी माहिती समोर आलेली. या विवाह सोहळ्याला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ‘थामा’च्या प्रमोशन दरम्यान, रश्मिकान हिंट दिलेली की, दोघांनीही साखरपुडा उरकला आहे आणि खूप आनंदी आहेत. विजयच्या टीमनं देखील पुष्टी केलेली की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. रश्मिकानं सांगितलेलं की, सर्वांना याबद्दल माहिती आहे. विजयच्या टीमनं असंही लिहिलेलं की, हे जोडपं पुढच्या वर्षी, कदाचित फेब्रुवारीमध्ये लग्न करण्याचा विचार करत आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, रश्मिकाचा तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी रश्मिकाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसलेली. चाहत्यांनी दावा केला की, विजयनं तिला ही अंगठी भेट दिली होती. याशिवाय, जेव्हा विजय त्याच्या कुटुंबासह मंदिरात जाताना दिसला, तेव्हा त्याच्या हातात रश्मिकाच्या अंगठीसारखीच अंगठी दिसत होती.
कशी सुरू झालेली दोघांची लव्हस्टोरी?
रश्मिका आणि विजय यांची पहिली भेट 2018 मध्ये ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. एका वर्षानंतर, ते ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले. चाहत्यांना लवकरच त्यांची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळेल.
