मनोरंजन क्षेत्रात संचिताचा कुणीही गॉडफादर नव्हता; अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर तिचे आजोबा काय म्हणाले?

कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं.

News Photo   2026 06 16T083124.150

मनोरंजन क्षेत्रात संचिताचा कुणीही गॉडफादर नव्हता; अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर तिचे आजोबा काय म्हणाले?

अभिनेत्री संचिता उगलेने आपलं आयुष्य संपवलं. (Ugle) संचितानं राहत्या घरी आत्महत्या केली. आता, संचिता उगले हिच्या आजोबांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, संचिता अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिनं स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. तिच्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता असं ते म्हणाले.

कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे तिनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे आम्हालाही समजत नाही. दरम्यान, या घटनेमुळं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून, तिच्या निधनानं चाहत्यांसह सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे. सध्या आचोळ पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

छावा’मधील अभिनेत्री संचिता उगलेने जीवन संपवलं; वयाच्या 30 व्या वर्षी केली आत्महत्या

संचिता उगलेचे आजोबा म्हणाले, तिची मनस्थिती किंवा त्या काळात ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, किंवा नेमकी समस्या काय होती? याबद्दल सांगायचं तर, तिचा कोणाशीही वाद नव्हता आणि कोणीही तिच्याबद्दल कधी वाईट बोललेलं नाही. ती खरोखरंच एक कर्तबगार तरुणी होती. तिनं संपूर्ण तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात मोठी ख्याती मिळवली होती असंही ते म्हणाले. त्याचबरोबर तिच्या टीव्ही मालिका पाहणारे तिला पूजा म्हणून ओळखायचे. त्या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झालेली. संपूर्ण नजर जिल्ह्यात तिला लोक ‘पूजा’ याच नावानं हाक मारायचे.

मी जेव्हा कधी तिथे जायचो, आणि ती माझी नात आहे असं सांगायचो, तेव्हा संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील नातेवाईक, ओळखीचे लोक तिला केवळ पूजा याच नावानं ओळखायचे. तिला ‘संचिता’ नावानं ओळखणारे क्वचितच होते. सर्वांनाच ती ‘पूजा’ म्हणूनच माहीत होती, जे नाव तिचं मालिकेत होतं. जे घडलं ते अत्यंत दुःखद आहे. तिनं असं का केलं? तिच्या मनात नक्की काय चाललं होतं? हे केवळ देवालाच ठाऊक, हे आमच्या आकलनाच्या पूर्णपणं पलीकडचं आहे असंही म्हणाले.

Exit mobile version