फॅशन, अभिनय, नृत्य अश्या वैविध्यपूर्ण माध्यमातून (Film) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तिच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपटाने जागतिक पातळीवर जाऊन पुन्हा नवी झेप घेतली आहे. संस्कृती बालगुडेच्या ‘करेज’ या पहिल्यावहिल्या इंग्रजी सिनेमाचे वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओमध्ये खास स्क्रिनिंग पार पडलं होत आणि आता हा चित्रपट थेट न्यू यॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डच्या ( क्वार्टर फायनलिस्ट ) मध्ये जाऊन पोहचला आहे.
विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग झालं असून आता हा चित्रपट न्यू यॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये पोहचला असून ही बाब संस्कृती सोबतीने संपूर्ण फिल्म टीम साठी अभिमानास्पद ठरतेय. युएसएमध्ये ‘करेज’चे सँटो डोम्निगो फिल्म फेस्टीवल स्क्रिनिंग पार पडले त्यानंतर या चित्रपटाचे स्क्रिनिंग लोकप्रिय ‘ वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ ‘मध्येदेखील पार झालं आणि “करेज” मधील संस्कृतीच्या भूमिकेचं साता समुद्रापार कौतुक झालं होत आता पुन्हा एकदा या चित्रपटाने जागतिक पातळीवर नवी ओळख संपादन केली आहे.
अशा संधी वारंवार मिळत नाहीत अन् दलदल; वेब सीरिजवर आदित्य रावल नेमकं काय म्हणाले?
अभिनेत्री संस्कृती बालगुडे पहिलीच मराठी अभिनेत्री होती जिच्या सिनेमाचे स्क्रिनिंग वॉर्नर ब्रदर्स सस्टुडिओमध्ये पार पडलं होत. आता करेज न्यू यॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डच्या ( क्वार्टर फायनलिस्ट ) मध्ये जाऊन पोहचला असताना या बद्दल बोलताना संस्कृती सांगते ” २०२३ शूट झालेला करेज हा माझा पहिला वाहिला इंग्रजी चित्रपट होता नंतर पुढे २०२४-२०२५ मध्ये या चित्रपटाचं अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं यातून आम्हाला प्रेक्षकांचं खूप प्रेम देखील मिळालं. परदेशात जाऊन भारतीय सिनेमाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली.
२०२६ मध्ये स्वतःचा संभवामि युगे युगे हा डान्स ड्रामा सुरू केला आणि आज करेज पुन्हा एकदा नव्या उंचीवर जाऊन पोहचला आहे याचा खूप अभिमान आहे संपूर्ण टीमच कौतुक आहे की भारतात बनलेल्या चित्रपटाचं सातासमुद्रापार होणार कौतुक बघून खूप भरून येतं. जागतिक स्थरावर आपण अभिनेत्री म्हणून ओळखले जाव ही इच्छा होती आणि ती करेज मुळे पूर्ण झाली याचा आनंद तर आहे पण या गोष्टीचं दडपण सुद्धा तितकंच आहे. २०२६ ची सुरुवात एवढी सुंदर झाली आणि अजून येणाऱ्या काळात काय नवनवीन गोष्टी अनुभवयाला मिळतील या साठी मी उत्सुक आहे”
करेज मध्ये संस्कृती साकारत असलेल्या भूमिकेचं नाव राणी असे असून तिच्यासह अभिनेता शरीब हाश्मी मुख्य भूमिकेत होता. त्याने या चित्रपटात ‘जयदीप’ ही भूमिका साकारली आहे. अंकुर काकतकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘करेज’चे दिग्दर्शन केल होत. संस्कृतीचा डान्स ड्रामा असलेल्या “संभवामि युगे युगे” देखील ऐकिकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असताना संस्कृती अजून कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.
