संस्कृतीच्या चित्रपटाची साता-समुद्रापार चर्चा, ‘करेज’चं सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये खास स्क्रिनिंग!
Sanskruti Balgudes Courage film screening at Santo Domingo USA Film Festival : फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्मसाठी चर्चेत आहे, हे कारण देखील तेवढं खास आहे. तिच्या ‘करेज’ या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल (Santo Domingo USA Film Festival) मध्ये निवड झाली. या चित्रपटाच खास स्क्रिनिंग तिकडे पार पडलं. करेज हा तिचा पहिला वहिला इंग्रजी चित्रपटचं आहे. ती या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली आहे.
अर्थसंकल्पाच्या पुर्वसंध्येला शेअर बाजार तेजी; निफ्टी 23,530च्या वर, मिडकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी
संस्कृतीची ही खास सफर नक्की कशी आहे, या बद्दल बोलताना संस्कृती म्हणते की एक मराठी मुलगी एवढ्या मोठ्या फिल्म फेस्टीवलमध्ये (Film Festival) सहभाग घेते. आपल्या भारताच प्रतिनिधित्व करते, याचा खूप अभिमान (Entertainment News) आहे. खूप छान वाटतंय आपल्यावर एक मोठी जवाबदारी आहे, याचं थोड प्रेशर देखील आहे. पण, हा अनुभव नक्कीच खूप कमालीचा आणि मस्त असणार आहे. मी यासाठी उत्सुक आहे. करेज चित्रपट अंकुर काकतकर यांनी दिग्दर्शित केला असून डॉ उदय देवस्कर आणि सुशांत तुंगारे यांनी या खास चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Gold Prices : अर्थसंकल्पापूर्वी सोने ८२ हजारांच्या पल्याड ; दरात मोठा फेरबदल होणार
आपण एकदा तरी वुमन ओरिएंटेड चित्रपट करावा ही इच्छा असताना करेज सारखा चित्रपट माझ्या वाट्याला येणं हे भाग्याचं आहे. (कंट्री ऑफ हॉनर) सेक्शनमध्ये आमच्या या फिल्मच स्क्रिनिंग होतंय. आम्ही चित्रपटाचं प्रतिनिधित्व करणार आहोत. संस्कृतीने आजवर अनेक विषयावर आधारित चित्रपट करून त्यात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. कायम काय वेगळेपणा असलेल्या भूमिका करू शकतो, याकडे तिचा कल असतो हे यातून बघायला मिळतं.
संस्कृतीचा हा पहिला वहिला इंग्रजी चित्रपट असला, तरी अगदी साता समुद्रापार तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. जगभरात संस्कृतीच्या ‘करेज’ या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे, पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे हे बघणं देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.