Download App

देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला सोहळा, वाघा बॉर्डरवर शर्वरी भावूक

  • Written By: Last Updated:

Sharvari Wagh Attended Attari-Wagah border ceremony : बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी (Sharvari Wagh) काल संध्याकाळी अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर (Bollywood Actress) होती. परंपरागत आणि स्टायलिश पोशाखात सजलेली शर्वरीने भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) द्वारे पार पाडल्या जाणाऱ्या भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाचा आनंद घेतला. देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला हा सोहळा पाहून शर्वरी भावूक झाली होती.

शर्वरीचे चाहते तिच्या स्वागतासाठी जमले होते. शर्वरीनेही प्रेमाने त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत फोटो काढले आणि या उत्साही वातावरणाचा आनंद घेतला. ध्वज अवतरण समारंभ आणि जोशपूर्ण संचलनासाठी प्रसिद्ध असलेल्या या समारंभाने (Attari-Wagah border ceremony) शर्वरीला भारावून टाकले. समारंभानंतर तिने BSF जवानांशी संवाद साधत त्यांच्या समर्पणासाठी कृतज्ञता व्यक्त केली. निघण्यापूर्वी शर्वरीने चाहत्यांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून या संध्याकाळला खास बनवले.

मुंडे-कोकाटेंचा राजीनामा…अण्णा हजारेंच्या मागणीवर सरकारचा निर्णय, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

मुंजा आणि महाराजासारख्या चित्रपटांमुळे शर्वरी घराघरात पोहोचलेली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट अल्फामुळे चर्चेत आहे. आदित्य चोप्रा निर्मित, हा YRF गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे. याचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केलंय. शर्वरीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

पंतप्रधानांचं कौतुक केलं तर तुम्ही ‘भक्त’, प्रिती नेमकी कोणावर संतापली? धक्कादायक कारण…

अल्फा’ हा आदित्य चोप्रा निर्मित एक गुप्तचर चित्रपट आहे. तो YRF गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे. याचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केलंय. जे ‘द रेल्वे मेन’ या स्ट्रीमिंग मालिकेसाठी ओळखले जातात, त्याची निर्मिती देखील YRF ने केली होती. गुप्तचर विश्वातील हा पहिला महिला-प्रणित चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळतेय.

follow us