पंतप्रधानांचं कौतुक केलं तर तुम्ही ‘भक्त’, प्रिती नेमकी कोणावर संतापली? धक्कादायक कारण…

Bollywood Actress Preity Zinta On Online Trolling : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) नेहमीच तिच्या स्पष्टवक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, तिने तिच्या X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सला (Online Trolling) तिने कडक शब्दांत फटकारलंय. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिची एक सोशल मिडिया पोस्ट तुफान व्हायरल होतेय. X वर केलेल्या पोस्टमध्ये तिने वाढत्या ट्रोलिंगबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेवर आणि ट्रोलिंगवर उघडपणे स्पष्टपणे बोलली आहे. प्रिती म्हणतेय की, लोक विचार न करता निर्णय घेतात. जर कोणी पंतप्रधानांची स्तुती केली तर त्याला ‘भक्त’ म्हटलं जातं. जर कोणी अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवून घेतलं तर त्याला ‘अंधभक्त’ असं नाव दिलं जातं. ती म्हणतेय की, लोक विनाकारण निष्कर्षांवर पोहोचतात. सोशल मीडियावर आपले विचार शेअर करताना प्रिती म्हणाली की, लोकांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करायला शिकले पाहिजे. ऑनलाइन निरोगी चर्चांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
What’s happening to people on social media? Everyone has become so cynical. If one talks about their first chat with an AI Bot then people presume it’s a paid promotion, if you appreciate ur PM then you are a bhakt & god forbid, if you are a proud Hindu or Indian 🇮🇳then ur an…
— Preity G Zinta (@realpreityzinta) February 21, 2025
सोशल मीडियावर वाढत्या ट्रोलिंगमुळे प्रिती नाराज असल्याचं स्पष्ट होतंय. X हॅंडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणतेय की, सोशल मीडियावरील लोकांना काय झालंय? सगळेच इतके संशयी का झालेत? जर कोणी एआय बॉटशी असलेल्या त्यांच्या पहिल्या चॅटबद्दल बोललं, तर लोक असे गृहीत धरतात की ते पगारी प्रमोशन आहे, जर तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचे कौतुक करत असाल तर तुम्ही ‘भक्त’ आहात आणि जर तुम्ही अभिमानी हिंदू किंवा भारतीय असाल तर तुम्ही ‘अंधभक्त’ आहात!
भीषण दुर्घटना! कामगारांवर काळाचा घाला; झोपेतच वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून ५ जणांचा मृत्यू
प्रितीने पुढे लिहिलंय की, आपण ते वास्तवात ठेवूया आणि लोकांना जसे आहेत तसे स्वीकारूया, जसं आपल्याला वाटतं तसं नाही. प्रितीच्या या विधानानंतर सोशल मीडियावर ही चर्चा रंगलीय. प्रिती झिंटाने लोकांना ‘शांत राहण्याचे’ आणि सोशल मीडियावर अधिक सकारात्मक आणि निरोगी चर्चा करण्यास प्रोत्साहित केलंय. ती म्हणते की, सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ असावं जिथे विचारांची आदरपूर्वक देवाणघेवाण केली जावी. अनावश्यक ट्रोलिंग आणि द्वेष पसरवण्यासाठी नाही.