Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?

Video : पोलीस अधीक्षक बदलले असले तरी, खालची यंत्रणा तीच; मस्साजोगमध्ये धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला अडीच महिने लोटलेत. आरोपी आणि पोलिसांचे लागेबंध असल्याचा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केलाय. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप देखील धनंजय देशमुखांकडून केला जातोय. तर आरोपींचं मनोबल वाढविण्यासाठी चित्रविचित्र लोक येत असल्याचं आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हटलंय. ते मस्साजोगमध्ये बोलत होते.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची दोनदा भेट झाल्याचं समोर आलं (Beed Crime) होतं. यावरून मोठं वादळ देखील उठलं होतं. त्यानंतर धस हे पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये आलेत. त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

अंबडमध्ये मोठा अपघात; चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस फलाटावर शिरली; दोन ठार तर पाच जखमी

यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मोठमोठाले बुट घातलेले अत्यंत चित्रविचित्र लोक इथे कसं काय येतात? ते आरोपींचं मनोबल वाढविण्यासाठी येत आहेत. त्यामुळे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गिते, गोरख फड, दत्ता बिकड यांचे सीडीआर तपास करून त्यांना सुद्धा सहआरोपी करावे, अशी मस्साजोगकरांची मागणी आहे. त्यानंतर आरोपींना फरार होण्यास मदत करणारं डॉक्टर संभाजी वायभासे दाम्पत्य, त्यांच्या बायकोने ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले. त्या सरकारी वकिल होत्या. संजय केदार, सारंग आंधळे, यांना देखील सहआरोपी करावं, असं पत्र मी स्वत:च्या सहीनं एसआयटीला पाठवलं. हे धनंजयला माहित असल्याचं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ही मागणी देखील रास्त असल्याचं धस यांनी म्हटलंय. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांची मित्र आहेत, असा दावा धनजंय देशमुख यांनी केलाय. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलाय. चार्जशीट दाखल करण्यापूर्वी मस्साजोगकरांनी आठ मागण्या मांडल्या आहेत. संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारहून उचलल्यानंतर शासकीय रूग्णालय केजकडे घेवून जाणे अपेक्षित असताना, ती गाडी केजकडे वळवण्यात आली, याची चौकशी करा अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय.

सावधान! स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात; मुलांमध्ये होतोय ‘हा’ बदल

आतापर्यंत नऊ आरोपी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी 302 मध्ये आलेत. दहावावा आरोपी अजून यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणामध्ये आहे. दहाव्या आरोपीला देखील 302च्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. दहावा आरोपी अजून फरार आहे. मी पहिल्या दिवसापासून मागणी करतोय की, नितीन बिक्कड याला देखील आरोपी करा. त्याने तांबोळी अन् आणखी काहीजणांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केलीय. पु्न्हा आरोपी वाशीवरून फरार करण्यात त्याचा वाटा मोठा आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube